पॉवर ऑफ मीडियाच्या कार्यकारिणी बैठकीमध्ये महत्त्वाचे निर्णय

विदर्भाला प्रतिनिधित्व,सहा विभागांची कोअर कमिटी होणार स्थापन

पॉवर ऑफ मीडियाच्या कार्यकारिणी बैठकीमध्ये महत्त्वाचे निर्णय

पावर ऑफ मीडिया फौंडेशन महाराष्ट्र  या पत्रकारांकरिता अहोरात्र झटणाऱ्या देशव्यापी संघटनेच्या कार्यकारणी बैठकीचे आयोजन कराड जि.सातारा येथे करण्यात आले होते. या बैठकीमध्ये काही निर्णय एकमताने पारित करण्यात आले त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे विदर्भाला किमान चार जागेवरती प्रतिनिधित्व देण्याचा निर्णय एकमताने पारित करण्यात आला. मुंबई मंत्रालय येथील संघटनेच्या कामकाजाकरिता मंत्रालय प्रतिनिधी म्हणून संस्थापक सचिव अनिल कदम यांचे सोबत अमरावती येथील जेष्ठ पत्रकार विदर्भ न्यूजचे प्रबंध संपादक उमेश लोटे यांची एकमताने निवड करण्यात आली. 

संघटनेचे विदर्भ सदस्य असलेले अमोल नानोटकर व अमरावती विभागीय अध्यक्ष उत्तम ब्राह्मणवाडे यांची पावर ऑफ मीडियाच्या संस्थापक कार्यकारिणीमध्ये निवड करण्यात आली. संस्थापक अध्यक्ष किशोर आबिटकर यांनी या निवडीची घोषणा केली. पावर ऑफ मीडिया ही देशव्यापी पत्रकार संघटना गेल्या अनेक वर्षांपासून पत्रकारांच्या न्याय मागण्यांकरिता अहोरात्र कार्यरत असून लवकरच संघटनेला ८० जी नुसार व १२ ए नुसार करामध्ये सवलती मिळविण्यामध्ये कार्यकारीणी यशस्वी होणार आहे. संपूर्ण महाराष्ट्राला सहा विभागांमध्ये विभागण्यात येऊन वीस सदस्यांची कोअर कमिटी तयार करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी संस्थापक उपाध्यक्ष महादेव चव्हाण यांनी दिली. संपूर्ण महाराष्ट्रातील व राज्याच्या बाहेरील सर्व पत्रकारांकरिता एकच सदस्य ऑनलाइन कार्यप्रणाली   राबविण्यात येणार असल्याचा महत्त्वाचा ठराव सर्वानुमते पारित करण्यात आला.  

पॉवर ऑफ मीडियाच्या वतीने वेगवेगळ्या पुरस्कार सोहळ्यांचे आयोजन करून पत्रकारांना त्यांचा न्याय हक्क देण्याचे कार्य येत्या कालावधीमध्ये पावर ऑफ मीडिया करणार असल्याचे संस्थापक सचिव अनिल कदम यांनी सांगितले.संघटनेची शासनाकडे एकमेव मागणी कितीतरी वर्षापासून प्रलंबित आहे आणि ती मागणी म्हणजे ग्रामीण पत्रकारांची व शहरी पत्रकारांची शासनाच्या दरबारी फक्त नोंद होणे हे गरजेचे आहे यासाठी मंत्रालय स्तरावर वारंवार पाठपुरावा करून ही मागणी कुठल्याही परिस्थितीमध्ये मान्य करून घेण्याचा संकल्प पावर ऑफ मीडियाच्या कार्यकारणी बैठकीमध्ये मुख्यत्वे करून करण्यात आला. पावर ऑफ मीडियाच्या कराड येथे पार पडलेल्या या बैठकीला पावर ऑफ मीडियाचे संस्थापक अध्यक्ष किशोर आबिटकर, उपाध्यक्ष महादेव चव्हाण संस्थापक सचिव अनिल कदम, कार्याध्यक्ष सतीश कदम, कार्यकारिणी सदस्य ताजुद्दीन शेख सहा विभागाचे विभागीय अध्यक्ष तसेच अमरावती विभागीय अध्यक्ष उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ सदस्य अमोल नानोटकर, अमरावती जिल्हाध्यक्ष उमेश लोटे,पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सतीश जाधव,सातारा जिल्हाध्यक्ष पराग शेनोलकर,कराड उत्तर अध्यक्ष अभिजित पवार,उंब्रज विभाग प्रमुख दिलीपराज चव्हाण, सदस्य संतोष चव्हाण,सदस्य महेश सूर्यवंशी व उंब्रज,पाल,मसूर,तासवडे टोल नाका परीसरातील पत्रकार सभासद बांधव उपस्थित होते.