कोल्हापूर की खड्डेपुर

कोकणातून पांढरी वाळू घेऊन आलेला ट्रक गेल्या पाच तासांहून अधिक वेळ एका खड्ड्यात फसल्याची घटना कोल्हापूरात घडलीये. जिल्ह्याधिकारी कार्यालयासमोरच ही घटना घडली आहे.

कोल्हापूर की खड्डेपुर
 जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात ट्रक खड्ड्यात ; वाहतुकीची कोंडी

कोल्हापूर/प्रतिनिधी

 कोकणातून पांढरी वाळू घेऊन आलेला ट्रक गेल्या पाच तासांहून अधिक वेळ एका खड्ड्यात फसल्याची घटना कोल्हापूरात घडलीये. जिल्ह्याधिकारी कार्यालयासमोरच ही घटना घडली आहे. एका कामासाठी कोल्हापूर महानगरपालिकेने हा खड्डा काढला होता पण त्या खड्याच्या सभोवती कोणत्याही पद्धतीने सुरक्षेच्या दृष्टीने बॅरिगेत लावण्यात आले नव्हते. त्यामुळेच या खड्ड्यात हा ट्रक फसला आहे. दरम्यान कोल्हापूरात गेल्या 24 तासांपेक्षा अधिक वेळ पावसाने झोडपून काढले आहे. त्यामुळे अनेक छोट्या मोठ्या खड्यांमध्ये पाणी साचले असल्याने वाहनचालकाला हे खड्डे दिसत नाहीयेत. सकाळी 8 च्या दरम्यान हा ट्रक या खड्ड्यात फसला असून प्रशासनाकडून कोणत्याही पद्धतीने या ट्रकला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करण्यात आले नाहीये. त्यामुळे या मार्गावर वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण झाली आहे. सुदैवाने या घटनेमध्ये ट्रक पलटी झाला नाही. महापालिकेच्या या भोंगळ कारभारामुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे पालिकेने असे खड्डे ताबडतोब बुजवून घ्यावेत अशी नागरिकांनी मागणी केलीये.