कोल्हापूर नाक्यावर उड्डाणपूल होणे आवश्यक – प्रांताधिकारी दिघे

कोल्हापूर नाक्यावर  उड्डाणपूल होणे आवश्यक – प्रांताधिकारी दिघे

कराड/प्रतिनिधी :

                       कोल्हापूर नाक्यावर  उड्डाणपूल व्हावा, यासाठी प्रशासनाची भूमिका जाणून घेण्यासाठी   येथील कराड अर्बन बँकेच्या जनशताब्धी सभाग्रहात बुधवारी 20 रोजी सकाळी 11.30 वाजता कृतीसमितीने प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित केली  होती. यावेळी बोलताना प्रांताधिकारी दिघे म्हणाले, कोल्हापूर नाका येथे वारंवार वाहतूक कोंडीसह छोटे-मोठे अपघात होत आहेत.  त्यामुळे याठिकाणी दुहेरी उड्डाणपूल व्हावा,  ही मागणी अत्यंत रास्त आहे. तसेच यासाठी निर्माण केलेल्या कृती समितीचा हेतू अतिशय  चांगला असून तो लवकरच साध्य होईल. पूर्वी हा महामार्ग नॅशनल हायवे क्र. 4 होता. मात्र, आता हा महामार्ग आशियाई महामार्ग क्रमांक 47 झाला आहेत्यामुळे या कामास थोडा विलंब होईल, पण उड्डाणपूल नक्की होईलअशी माहिती प्रांताधिकारी उत्तम  दिघे यांनी दिली.

                          येथील कोल्हापूर नाका येथे उड्डाणपूला अभावी वारंवार अपघात होण्याचे प्रमाण वाढले असून याठिकाणी अनेकांना नाहक आपल्या प्राणास मुकावे लागले आहे.  व्हावा, यासाठी  सध्या  कराड, मलकापूरसह परिसरातील नागरिकांनी मोठा उठाव केला आहे. हा उठाव आता एक जनचळवळ  बनू लागला  असल्याची परिस्थिती दिसून येत आहे. या प्रश्नाबाबत प्रशासनाची कृतीसमितीबरोबर  बैठक पार पडली. या बैठकीत प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार आमरदीप वाकडे  व उपविभागीय पोलीस अधिकारी सुरज गुरव, वाहतूक पोलीस प्रमुख सतीश पवार, यांनी  कृतीसमितीला मार्गदर्शन केले. यावेळी मलकापूर नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, कृती समितीचे पदाधिकारी व नगरसेवक सौरभ पाटील, सामाजिक कार्यकर्ते प्रमोद तोडकर, प्रमोद पाटील, मनसेचे मलकापूर शहराध्यक्ष दादासो सिंघन, शहराध्यक्ष सागर बर्गे व नागरिक मोठ्या संखेने उपस्थित होते.