काँग्रेसच्या जयश्री जाधवांनी जोतिबा यात्रेदिनी उधळला विजयी गुलाल

महाविकास आघाडीचा दैदिप्यमान विजय,सतेज पाटलांची यशस्वी झुंज

काँग्रेसच्या जयश्री जाधवांनी जोतिबा यात्रेदिनी  उधळला विजयी गुलाल


जयश्री जाधव कोल्हापुरातील पहिल्या महिला आमदार, सत्यजीत कदम यांचा पराभव
 

कोल्हापूर/प्रतिनिधी

 

संपूर्णराज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीने बाजी मारली आहे. काँग्रेसच्या जयश्री जाधव यांचा विजय झाला आहे. कोल्हापुरातून पहिली महिला आमदार म्हणून विधानसभेत जाण्याचा मान काँग्रेसच्या जयश्री जाधव यांना मिळाला आहे. तर पोटनिवडणुकीच्या निमित्ताने कोल्हापूरमध्ये आमदारकीचं खातं उघडण्याचं भाजपचं स्वप्न अधुरं राहिलं.

काँग्रेसच्या चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर महाविकास आघाडीकडून जयश्री जाधव यांनी निवडणूक लढवली तर भाजपकडून सत्यजीत कदम निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. राज्यात एकच पोटनिवडणूक असल्याने दोन्ही बाजूंनी प्रचाराचा सर्वोच्च बिंदू गाठला. राज्यातील जवळपास सर्व नेत्यांनी कोल्हापुरात येऊन प्रचार केला. त्यामुळे निकालाची उत्सुकता होती. 

 

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या जिल्ह्यातच भाजपा पराभूत !

कोल्हापूर उत्तर मध्ये मातोश्रीचा आदेश शिवसेनिकांनी पाळला!!

कोल्हापूर उत्तरची विधानसभा पोटनिवडणुक संपूर्ण महाराष्ट्र भर गाजली. खऱ्या अर्थाने या जागेवर महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांना बिनविरोध करणे गरजेचे होते. मात्र भाजपने या पोटनिवडणुकीत सत्यजित कदम यांना रिंगणात उतरवत कोल्हापूर जनतेवर ही निवडणूक लादण्यात यश मिळवले.खरतर या मतदारसंघात शिवसेनेला मानणारे गट मोठा आहे. बाळासाहेबांच्या विचारांशी एकमत असलेले एकनिष्ठ शिवसैनिक कोल्हापूर मध्ये आहेत. सुरूवातीला राजेश क्षिरसागर ही नाराज होते. मात्र मातोश्री वरून आदेश आला.आणी क्षिरसागर यांच्या सह सर्व शिवसैनिकांनी निवडणुक आपल्या खांद्यावर घेत प्रचार प्रकियेला सुरुवात केली. काँग्रेसचे सतेज पाटील,राष्ट्रवादीचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी या निवडणुकीत सर्व जबाबदारी स्वताकडे घेत सर्व कार्यकर्तांना कामे वाटून देत.परफेक्ट नियोजन करत चंद्रकांत पाटील यांचा करेक्ट कार्यक्रम करण्यासाठी दिवस रात्र एक करत यंत्रणा उभी केली! ती आखली! आणी सक्केस ही केली ! 

              काँग्रेसचे सतेज पाटील, राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ हे जरी एकत्र आले असले तरी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिक पणे काम केल्याशिवाय भाजपचा पराभव करणे शक्य नव्हते! भाजपने शिवसेनेच्या नाराजीचा फायदा घेण्याचे ठरविले होते. मात्र बाळासाहेबांचे शिवसैनिकांना मातोश्री वरील आदेश अंतिम मानतात. याचा विसर भाजपला व चंद्रकांत पाटील यांना पडला असावा म्हणूनच विजयाचा दावा भाजपकडून करण्यात येत होता. भाजपने या पोटनिवडणुकीत महाराष्ट्रातील अनेक दिग्गज नेत्यांना प्रचारासाठी बोलावत जाहीर सभेचे ही आयोजन केले होते. मग सतेज पाटील,हसन मुश्रीफ यांच्या पाठीशी राहण्यासाठी महाविकास आघाडी मधील बडे नेतेही प्रचारात उतरले ! व ही निवडणूक जयश्री जाधव व सत्यजित कदम यांची न राहता ती सतेज पाटील विरूद्ध चंद्रकांत पाटील म्हणून रंगत वाढत गेली.व भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी प्रतिष्ठेची लढाई सुरू झाली. भाजपचे बुथ पातळीवर जाऊन पध्दशीर पणे नियोजन केले होते. मात्र सतेज पाटील, हसन मुश्रीफ यांनी ही सर्व कार्यकर्तांना जबाबदारी वाटून दिल्या.व घर टू घर पोहण्याचा प्रयत्न करत प्रचार केला. या सर्व प्रचाराला यश आल्याचे या निकालावरून स्पष्ट दिसते.महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने ही पोटनिवडणुक लिटमस टेस्ट होती.  चंद्रकांत पाटील बोलले होते की 100%,200%,300% भाजपच जिंकणार पण आज चंद्रकांत पाटील यांचा स्वताच्या जिल्ह्यात पराभव झाला आहे. त्यामुळे यापुढे बोलताना दादांना विचार करून बोलाव लागणार  आहे.

शेवटी पुन्हा एखदा शिवसेनेने दाखवून दिले की मातोश्रीचा अंतिम आदेश हा आमच्या साठी महत्त्वाचा असतो.