कोल्हापूरातील सर्व शाळा कचरामुक्त व तंबाखु मुक्त करणार - आयुक्त डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी

कोल्हापूर शहरातील सर्व शाळा कचरा मुक्त करुन कोल्हापूर शहर स्वच्छ, सुंदर हरित ची संकल्पना राबविणे आवश्यक असून याची सुरवात आपले घरातील व्यक्ती, आपली शाळेतील विद्यार्थी यांची जनजागृती करुन करावी लागणार आहेत. हे कार्य यशस्वी करणेसाठी प्रथम आपण स्वत: पासून सुरवात केली पाहिजे,असे आवाहन आयुक्त डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी आणि केले आहे.       

कोल्हापूरातील सर्व शाळा कचरामुक्त व तंबाखु मुक्त करणार - आयुक्त डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी

 

कोल्हापूर /प्रतिनिधी 

कोल्हापूर शहरातील सर्व शाळा कचरा मुक्त करुन कोल्हापूर शहर स्वच्छ, सुंदर हरित ची संकल्पना राबविणे आवश्यक असून याची सुरवात आपले घरातील व्यक्ती, आपली शाळेतील विद्यार्थी यांची जनजागृती करुन करावी लागणार आहेत. हे कार्य यशस्वी करणेसाठी प्रथम आपण स्वत: पासून सुरवात केली पाहिजे,असे आवाहन आयुक्त डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी आणि केले आहे.                                                                                                                                       स्वच्छ व सुंदर हरित कोल्हापूर या संकल्पनेची अंमलबजावणी कोल्हापूर महानगरपालिकेमार्फत करणेत येत आहे. या अनुषंगाने सातत्याने स्वच्छता मोहिम लोकसहभागातून कोल्हापूर शहरात वेगवेगळ्या ठिकाणी राबविणेत येत आहे. या स्वच्छता मोहिमे अंतर्गत जयंती नाला व जयंती नाला परिसर, शहरातील उद्याने, रंकाळा तलाव, शहरातील लहान मोठे नाले यांची स्वच्छता सेवाभावी संस्था, तरुण मंडळे, तालीम संस्था, सामाजिक संस्था, विविध संघटना व नागरिक यांनी सहभाग नोंदवून उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे. त्याचबरोबर राज्यातील सर्व शाळा तंबाखुमुक्त करणेची कार्यवाही शासन स्तरावरुन सुरु आहे.  
त्या अनुषंगाने आज कोल्हापूर शहरातील सर्व शाळा कचरामुक्त व तंबाखुमुक्त करणेसाठी आयुक्त डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी यांनी सकाळी 09.30 वाजता संगीतसुर्य केशवराव भोसले नाट्यगृह येथे शाळांतील मुख्याध्यापक, स्वच्छता दूत शिक्षक यांची कार्यशाळा आयोजन करण्यात आली होती.
या कार्यशाळेत सागरमित्र अभियानचे विनोद बोधनकर हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. विनोद बोधनकर यांनी एक तासाच्या चित्रफितीमधून पुणे शहर येथील माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांच्या श्रमदानातून प्लास्टिक मुक्ती यशस्वीपणे राबविलेचे सांगितले. सागरमित्र अभियानाअंतर्गत माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना प्लास्टिक प्रदुषणामूळे होणाऱ्या मुक्या प्राण्याच्या जिवीतहानी बद्दल माहिती दिली. यामूळे प्रभावित होवून ते विद्यार्थी पक्षी, मासे, यांना वाचविण्यासाठी घरातच कागदाची रद्दी ज्या प्रमाणे जमा करण्याची पध्दत आहे त्याच प्रमाणे टाकाऊ प्लॉस्टिकची रद्दी जमा करु लागले. घरातले महिन्याभराचे जमा केलेले टाकाऊ प्लास्टिक महिन्यातून एकदा शाळेत आणून देतात. हे प्लास्टिक एकत्र करुन रिसायकलींगला पाठविले जाते. अशा प्रकारे पुण्यातील 153 शाळांतील 1,37,000 विद्यार्थी हे काम करीत आहेत. त्यामूळे 200 टन स्वच्छ, कोरडे, रिकामे प्लास्टिक रिसायकल झालेने मुलांवर जलसंस्कार सुरु झाले असलेचे मत व्यक्त केले, पर्यावरण तज्ज्ञ उदय गायकवाड यांनी कचरा मुक्ती, तसेच पत्रकार बाळासाहेब पाटील स्वच्छता व तंबाखु मुक्त व अनिल चौगुले निसर्गप्रेमी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
सलाम मुंबई फाऊंडेशन चे जिल्हा समन्वयक रवी कांबळे यांनी सर्व शाळा तंबाखुमुक्ती संदर्भात मार्गदर्शन केले. यावेळी तंबाखु मुक्ती संदर्भातील फलक शाळांना वाटप करणेत आले. जिल्हा तंबाखु नियंत्रण कक्ष, जिल्हा शल्य चिकित्सक, सी.पी.आर. हॉस्पिटल कोल्हापूर मार्फत विविध उपक्रम राबविणेत येणार असून उच्च न्यायालयाने सिगरेट व तंबाखुजन्य पदार्थ नियंत्रण कायदा 2003 मधील कलम 6 ची अंमलबजावणी सर्व शैक्षणिक संस्थंमध्ये करण्याबाबत आदेश दिलेले असलेचे सांगितले.
तंबाखूमुळे होणारे तुरुणांचे मृत्यू ही एक टाळता येण्याजोगी गोष्ट आहे. तंबाखूचा वाढता वापर आणि त्याच्या दुष्परिणामामुळे जागतिक आरोग्य संघटेने जागतिक समस्या म्हणून घोषित केले आहे. तंबाखूममुळे ह्दयरोग, तोंडाचा कर्करोग, फुफ्फुसाचा आजार तसेच इतर असंसर्गजन्य रोगांचे कारण तंबाख्ूचा वापर हे आहे. विद्यार्थ्यांना तंबाखूजन्य पदार्थ्याच्या आहारी जाण्यापासून वाचविणे ही समाज, पालक व शिक्षक  यांची जबाबदारी आहे. 
शाळेच्या प्रवेशद्वारावर तंबाखुच्या दुष्यपरिणामाबाबत माहिती देणारा फलक लावणे बंधनकारक आहे. शाळांपासून 100 यार्ड परिसरात तंबाखू व तंबाखूजन्य प्रदार्थाची विक्री बंदिबाबतचे फलक लावणे आवश्यक आहे. संस्था प्रमुख (मुख्याध्यापक) यांनी शाळेमध्ये कुठल्याची तंबाखुजन्य पदार्थाचे सेवन होत नाही व तसेच शाळेच्या आवारात कुठलेही तंबाख्ुाजन्य पदार्थ उपलब्ध नाहीत. आम्ही सिगारेट/बिडी चे अवशेष व तसेच तंबाखु खाऊन थुंकणे या बाबतीत शाळेच्या आवारात तपासणी केली असता आम्हाला सदर गोष्टी आढळून आल्या नाहीत असे स्वाक्षरी घोषणापत्र फोटोसहीत शाळेच्या दर्शनी ठिकाणी फलक लावावेत अशा सुचना केल्या. शाळांच्या आवारात किंवा परिसरात नागरिक, पालक व शालेय कर्मचारी तंबाखू किंवा तंबाखूजन्य पदार्थ खात असल्यास त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या मनावर होतो. विद्यार्थी त्याकडे आकर्षित होऊ शकतात. त्यामूळे शालेय आवारात/परिसरात नागरिक, पालक व शालेय कर्मचारी वर्ग यांनी तंबाख्ू व तंबाखूजन्य पदार्थ्यांचे सेवन करु नयेे असे मत व्यक्त केले. डॉ. अर्चना पाटील यांनी उपस्थित मुख्याध्यापक व शिक्षकांना शाळा तंबाखु मुक्त करणे संदर्भात शपथ दिली.
आयुक्त डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी म्हणाले कोल्हापूर शहरातील सर्व शाळा कचरा मुक्त करुन कोल्हापूर शहर स्वच्छ, सुंदर हरित ची संकल्पना राबविणे आवश्यक असून याची सुरवात आपले घरातील व्यक्ती, आपली शाळेतील विद्यार्थी यांची जनजागृती करुन करावी लागणार आहेत. हे कार्य यशस्वी करणेसाठी प्रथम आपण स्वत: पासून सुरवात केली पाहिजे. आपण घरामधील ओला कचरा इतरत्र टाकून न देता त्या पासून खत निर्मिती करुन आपल्या घरातील झाडांसाठी वापर करु शकतो. या बाबत शाळांतील शिक्षकांच्या स्पर्धा आयोजित करुन जे शिक्षक जास्तीत जास्त खताची निर्मिती करतील अशा निसर्गाने आपणास मोफत दिले आहे तेच आपण सुध्दा निसर्गास मोफत देवू शकतो अशी भावना प्रत्येक व्यक्तीने मनामध्ये ठेवणे आवश्यक आहे. घरामध्ये ओला कचरा व सुका कचरा याची वर्गवारी करणे आवश्यक असलेचे मत व्यक्त केले. 
सदर कार्यशाळेमध्ये पहिल्या टप्यात खालील 16 शाळांनी सागरमित्र अभियानाची व्यापक मोहिम राबविणेसाठी पुढाकार घेवून सदर शाळेत सागरमित्र अभियान उपक्रम राबविणेचा संकल्प करण्यात आला. कार्यक्रमास उपस्थित असणाऱ्या मान्यवरांचे आभार राष्ट्रीय तंबाखु नियंत्रण कक्षाच्या डॉ. अर्चना पाटील यांनी मानले.
या कार्यक्रमास प्रशासन अधिकारी शंकर यादव, कोल्हापूर शहरातील प्राथमिक, माध्यमिक शाळांतील मुख्याध्यापक, शिक्षक, प्राथमिक शिक्षण समितीकडील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.