#KolhapurFloods महापुराचा विळखा सैल होतोय; पण...

कोल्हापूर - शहरासह जिल्ह्याला पडलेला पुराचा विळखा हळूहळू सैल होत असला तरी करवीर तालुक्‍यातील चिखली, आंबेवाडी, शिरोळ तालुक्‍यातील बहुतांश गावांतील पूरस्थिती अजूनही ‘जैसे थे’ आहे.  धरणांतील पाण्याचा विसर्ग आज कमी झाला असला तरी पंचगंगेसह जिल्ह्यातील नद्यांची पातळी फारशी कमी झालेली नाही. सोमवारी सायंकाळी संपलेल्या चोवीस तासांत पंचगंगेच्या पातळीत केवळ दीड फुटाने घट झाली होती. रविवारी सायंकाळी ४९.१ फुटांवरून वाहणारी पंचगंगा आज अजूनही धोक्‍याच्या पातळीवर असून पातळी ४७ फुटांवर आहे.  कालपर्यंत राधानगरीसह इतर धरणांतून सुरू असलेला मोठ्या प्रमाणातील पाण्याचा विसर्ग आज कमी झाला. राधानगरीतून केवळ १४०० क्‍युसेक तर कोयना धरणातून ३६ हजार ३१० क्‍युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. वारणा, काळम्मावाडी, पाटगाव, कुंभी धरणातील विसर्गही कमी करण्यात आला. अलमट्टी धरणातून पाच लाख ४० हजार क्‍युसेक विसर्ग सुरू आहे. अलमट्टीचा विसर्ग वाढवूनही शहर व जिल्ह्यातील नद्यांच्या पातळीत म्हणावी तशी घट झालेली नाही. शिरोळ तालुक्‍यातील पूरस्थितीही कायम आहे. शिरोळमध्ये पुरामुळे स्थलांतरित झालेल्या लोकांना आजही हेलिकॉप्टरद्वारे खाद्यपदार्थासह जीवनावश्‍यक वस्तूंचा पुरवठा करण्यात आला.  जिल्ह्यात आज सकाळी संपलेल्या २४ तासांत सरासरी १८.३७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. गगनबावडा तालुक्‍यात सर्वाधिक ५५ तर शिरोळ तालुक्‍यात सर्वात कमी ३.४३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. आतापर्यंत जिल्ह्यात सरासरी २११९.३४ मिलिमीटर पाऊस झाला. सातारा जिल्ह्यातील कोयना धरणासह जिल्ह्यातील सर्व धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत. राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे बंद झाले आहेत.  महामार्गासह इतर मार्ग खुले दरम्यान, गेल्या आठ दिवसांपासून पुराच्या पाण्याखाली असलेला पुणे-बंगळूर महामार्ग आज सुरू करण्यात आला. सकाळी एकेरी तर सायंकाळनंतर दुतर्फा वाहतूक सुरू झाली. सकाळच्या सत्रात या मार्गावरून पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडरसह इतर जीवनावश्‍यक वस्तूंचा पुरवठा करणारी वाहने शहरात आणण्यात आली. या मार्गाशिवाय कोल्हापूरहून पुणे, पणजी, इचलकरंजी, कोडोली आदी मार्गावरील वाहतूकही सुरू झाली. जिल्ह्यातील ८४ बंधारे अजूनही पाण्याखाली असून यावरील वाहतूक काही ठिकाणी पूर्णपणे बंद तर काही ठिकाणी पर्यायी मार्गाने सुरू आहे.  रेल्वे वाहतूक अद्यापही रूकडी येथे पुराचे पाणी धोक्याच्या पातळीवर असल्याने कोल्हापूरकडे जाणारा रेल्वे मार्ग अद्यापही बंद आहे. सर्व एक्स्प्रेस गाड्या मिरजेतून सुटून मिरजेपर्यंतच येत आहेत. मिरज - पुणे रेल्वे सुरू आहे. काही पॅसेंजर गाडी रूकडीपर्यत सोडण्यात येत आहे.  चंदगड तालुक्यातील हे मार्ग वाहतुकीसाठी खुले चंदगड - गडहिंग्लज , चंदगड -बेळगाव, चंदगड - तिलारीनगर, पाटणे फाटा - तिलारीनगर हे सर्व मुख्य मार्ग वाहतुकीसाठी खुले झालेत . एसटी वाहतूक सुरू झालेले मार्ग कोल्हापूर- गारगोटी, कोल्हापूर- गडहिंग्लज- संकेश्‍वर, कोल्हापूर- वारणा कोडोली, कोल्हापूर- हुपरी, कोल्हापूर- आजरा, कोल्हापूर- कागल, कोल्हापूर- पुणे- मुंबई   दृष्टिक्षेपात ० पुणे-बंगळूर महामार्ग वाहतुकीसाठी खुला ० महामार्गावरून इंधनासह जीवनावश्‍यक वस्तूंची वाहने शहरात ० शहरातील बहुतांश पंपांवर इंधनपुरवठा सुरू, वाहनधारकांच्या लांबच लांब रांगा ० शहरातील गॅसपुरवठाही होतोय सुरळीत ० शिरोळमधील काही गावांना बेटाचे स्वरूप  ० तेथील दीड लाख तर जिल्ह्यातील अडीच लाख लोक छावण्यांमध्ये ० अलमट्टीतून ५ लाख ४० हजार क्‍युसेक विसर्ग ० शहरातील पाणी ओसरलेल्या भागात स्वच्छता मोहीम सुरू ० शहरातील अनेक भागात अजूनही पुराचे पाणी घुसलेलेच  ० पूरग्रस्तांना विविध संस्थांकडून मदतीचा ओघ सुरूच ० चिखली, आंबेवाडीला पुराचा वेढा कायम ० मृत जनावरे नदीकाठावर, दुर्गंधीचे साम्राज्य ० ‘गोकुळ’चे दूध संकलन घटलेलेच  ० कोल्हापूर-रत्नागिरी मार्ग अजूनही बंदच ० गगनबावडा मार्गावरही रस्त्यावर अजून पाणी ० कोल्हापूर-राधानगरी मार्गावर हळदीजवळ रस्ता बंद राधानगरी धरणाचे सर्व दरवाजे बंद अखेर रविवार (ता. ११)पासून पावसाने पूर्ण उघडीप दिल्याने राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे बंद झाले. शिवाय, मेन गेटही बंद केल्याने पूर्ण विसर्ग थांबला आहे. यामुळे भोगावती नदीचे पाणी झपाट्याने असल्याने मार्गही आजपासून वाहतुकीसाठी खुले झाले. या परिसरातील जनजीवन आता पूर्वपदावर येत आहे.   News Item ID: 599-news_story-1565666199Mobile Device Headline: #KolhapurFloods महापुराचा विळखा सैल होतोय; पण...Appearance Status Tags: Section NewsSite Section Tags: Paschim Maharashtra Mobile Body: कोल्हापूर - शहरासह जिल्ह्याला पडलेला पुराचा विळखा हळूहळू सैल होत असला तरी करवीर तालुक्‍यातील चिखली, आंबेवाडी, शिरोळ तालुक्‍यातील बहुतांश गावांतील पूरस्थिती अजूनही ‘जैसे थे’ आहे.  धरणांतील पाण्याचा विसर्ग आज कमी झाला असला तरी पंचगंगेसह जिल्ह्यातील नद्यांची पातळी फारशी कमी झालेली नाही. सोमवारी सायंकाळी संपलेल्या चोवीस तासांत पंचगंगेच्या पातळीत केवळ दीड फुटाने घट झाली होती. रविवारी सायंकाळी ४९.१ फुटांवरून वाहणारी पंचगंगा आज अजूनही धोक्‍याच्या पातळीवर असून पातळी ४७ फुटांवर आहे.  कालपर्यंत राधानगरीसह इतर धरणांतून सुरू असलेला मोठ्या प्रमाणातील पाण्याचा विसर्ग आज कमी झाला. राधानगरीतून केवळ १४०० क्‍युसेक तर कोयना धरणातून ३६ हजार ३१० क्‍युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. वारणा, काळम्मावाडी, पाटगाव, कुंभी धरणातील विसर्गही कमी करण्यात आला. अलमट्टी धरणातून पाच लाख ४० हजार क्‍युसेक विसर्ग सुरू आहे. अलमट्टीचा विसर्ग वाढवूनही शहर व जिल्ह्यातील नद्यांच्या पातळीत म्हणावी तशी घट झालेली नाही. शिरोळ तालुक्‍यातील पूरस्थितीही कायम आहे. शिरोळमध्ये पुरामुळे स्थलांतरित झालेल्या लोकांना आजही हेलिकॉप्टरद्वारे खाद्यपदार्थासह जीवनावश्‍यक वस्तूंचा पुरवठा करण्यात आला.  जिल्ह्यात आज सकाळी संपलेल्या २४ तासांत सरासरी १८.३७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. गगनबावडा तालुक्‍यात सर

#KolhapurFloods महापुराचा विळखा सैल होतोय; पण...

कोल्हापूर - शहरासह जिल्ह्याला पडलेला पुराचा विळखा हळूहळू सैल होत असला तरी करवीर तालुक्‍यातील चिखली, आंबेवाडी, शिरोळ तालुक्‍यातील बहुतांश गावांतील पूरस्थिती अजूनही ‘जैसे थे’ आहे. 

धरणांतील पाण्याचा विसर्ग आज कमी झाला असला तरी पंचगंगेसह जिल्ह्यातील नद्यांची पातळी फारशी कमी झालेली नाही. सोमवारी सायंकाळी संपलेल्या चोवीस तासांत पंचगंगेच्या पातळीत केवळ दीड फुटाने घट झाली होती. रविवारी सायंकाळी ४९.१ फुटांवरून वाहणारी पंचगंगा आज अजूनही धोक्‍याच्या पातळीवर असून पातळी ४७ फुटांवर आहे. 

कालपर्यंत राधानगरीसह इतर धरणांतून सुरू असलेला मोठ्या प्रमाणातील पाण्याचा विसर्ग आज कमी झाला. राधानगरीतून केवळ १४०० क्‍युसेक तर कोयना धरणातून ३६ हजार ३१० क्‍युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. वारणा, काळम्मावाडी, पाटगाव, कुंभी धरणातील विसर्गही कमी करण्यात आला. अलमट्टी धरणातून पाच लाख ४० हजार क्‍युसेक विसर्ग सुरू आहे. अलमट्टीचा विसर्ग वाढवूनही शहर व जिल्ह्यातील नद्यांच्या पातळीत म्हणावी तशी घट झालेली नाही.

शिरोळ तालुक्‍यातील पूरस्थितीही कायम आहे. शिरोळमध्ये पुरामुळे स्थलांतरित झालेल्या लोकांना आजही हेलिकॉप्टरद्वारे खाद्यपदार्थासह जीवनावश्‍यक वस्तूंचा पुरवठा करण्यात आला. 
जिल्ह्यात आज सकाळी संपलेल्या २४ तासांत सरासरी १८.३७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. गगनबावडा तालुक्‍यात सर्वाधिक ५५ तर शिरोळ तालुक्‍यात सर्वात कमी ३.४३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. आतापर्यंत जिल्ह्यात सरासरी २११९.३४ मिलिमीटर पाऊस झाला. सातारा जिल्ह्यातील कोयना धरणासह जिल्ह्यातील सर्व धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत. राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे बंद झाले आहेत.  
महामार्गासह इतर मार्ग खुले
दरम्यान, गेल्या आठ दिवसांपासून पुराच्या पाण्याखाली असलेला पुणे-बंगळूर महामार्ग आज सुरू करण्यात आला. सकाळी एकेरी तर सायंकाळनंतर दुतर्फा वाहतूक सुरू झाली. सकाळच्या सत्रात या मार्गावरून पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडरसह इतर जीवनावश्‍यक वस्तूंचा पुरवठा करणारी वाहने शहरात आणण्यात आली. या मार्गाशिवाय कोल्हापूरहून पुणे, पणजी, इचलकरंजी, कोडोली आदी मार्गावरील वाहतूकही सुरू झाली. जिल्ह्यातील ८४ बंधारे अजूनही पाण्याखाली असून यावरील वाहतूक काही ठिकाणी पूर्णपणे बंद तर काही ठिकाणी पर्यायी मार्गाने सुरू आहे. 

रेल्वे वाहतूक

अद्यापही रूकडी येथे पुराचे पाणी धोक्याच्या पातळीवर असल्याने कोल्हापूरकडे जाणारा रेल्वे मार्ग अद्यापही बंद आहे. सर्व एक्स्प्रेस गाड्या मिरजेतून सुटून मिरजेपर्यंतच येत आहेत. मिरज - पुणे रेल्वे सुरू आहे. काही पॅसेंजर गाडी रूकडीपर्यत सोडण्यात येत आहे. 

चंदगड तालुक्यातील हे मार्ग वाहतुकीसाठी खुले

चंदगड - गडहिंग्लज , चंदगड -बेळगाव, चंदगड - तिलारीनगर, पाटणे फाटा - तिलारीनगर हे सर्व मुख्य मार्ग वाहतुकीसाठी खुले झालेत .

एसटी वाहतूक सुरू झालेले मार्ग
कोल्हापूर- गारगोटी, कोल्हापूर- गडहिंग्लज- संकेश्‍वर, कोल्हापूर- वारणा कोडोली, कोल्हापूर- हुपरी, कोल्हापूर- आजरा, कोल्हापूर- कागल, कोल्हापूर- पुणे- मुंबई

दृष्टिक्षेपात
० पुणे-बंगळूर महामार्ग वाहतुकीसाठी खुला
० महामार्गावरून इंधनासह जीवनावश्‍यक वस्तूंची वाहने शहरात
० शहरातील बहुतांश पंपांवर इंधनपुरवठा सुरू, वाहनधारकांच्या लांबच लांब रांगा
० शहरातील गॅसपुरवठाही होतोय सुरळीत
० शिरोळमधील काही गावांना बेटाचे स्वरूप 
० तेथील दीड लाख तर जिल्ह्यातील अडीच लाख लोक छावण्यांमध्ये
० अलमट्टीतून ५ लाख ४० हजार क्‍युसेक विसर्ग
० शहरातील पाणी ओसरलेल्या भागात स्वच्छता मोहीम सुरू
० शहरातील अनेक भागात अजूनही पुराचे पाणी घुसलेलेच 
० पूरग्रस्तांना विविध संस्थांकडून मदतीचा ओघ सुरूच
० चिखली, आंबेवाडीला पुराचा वेढा कायम
० मृत जनावरे नदीकाठावर, दुर्गंधीचे साम्राज्य
० ‘गोकुळ’चे दूध संकलन घटलेलेच 
० कोल्हापूर-रत्नागिरी मार्ग अजूनही बंदच
० गगनबावडा मार्गावरही रस्त्यावर अजून पाणी
० कोल्हापूर-राधानगरी मार्गावर हळदीजवळ रस्ता बंद

राधानगरी धरणाचे सर्व दरवाजे बंद
अखेर रविवार (ता. ११)पासून पावसाने पूर्ण उघडीप दिल्याने राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे बंद झाले. शिवाय, मेन गेटही बंद केल्याने पूर्ण विसर्ग थांबला आहे. यामुळे भोगावती नदीचे पाणी झपाट्याने असल्याने मार्गही आजपासून वाहतुकीसाठी खुले झाले. या परिसरातील जनजीवन आता पूर्वपदावर येत आहे.

News Item ID: 
599-news_story-1565666199
Mobile Device Headline: 
#KolhapurFloods महापुराचा विळखा सैल होतोय; पण...
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

कोल्हापूर - शहरासह जिल्ह्याला पडलेला पुराचा विळखा हळूहळू सैल होत असला तरी करवीर तालुक्‍यातील चिखली, आंबेवाडी, शिरोळ तालुक्‍यातील बहुतांश गावांतील पूरस्थिती अजूनही ‘जैसे थे’ आहे. 

धरणांतील पाण्याचा विसर्ग आज कमी झाला असला तरी पंचगंगेसह जिल्ह्यातील नद्यांची पातळी फारशी कमी झालेली नाही. सोमवारी सायंकाळी संपलेल्या चोवीस तासांत पंचगंगेच्या पातळीत केवळ दीड फुटाने घट झाली होती. रविवारी सायंकाळी ४९.१ फुटांवरून वाहणारी पंचगंगा आज अजूनही धोक्‍याच्या पातळीवर असून पातळी ४७ फुटांवर आहे. 

कालपर्यंत राधानगरीसह इतर धरणांतून सुरू असलेला मोठ्या प्रमाणातील पाण्याचा विसर्ग आज कमी झाला. राधानगरीतून केवळ १४०० क्‍युसेक तर कोयना धरणातून ३६ हजार ३१० क्‍युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. वारणा, काळम्मावाडी, पाटगाव, कुंभी धरणातील विसर्गही कमी करण्यात आला. अलमट्टी धरणातून पाच लाख ४० हजार क्‍युसेक विसर्ग सुरू आहे. अलमट्टीचा विसर्ग वाढवूनही शहर व जिल्ह्यातील नद्यांच्या पातळीत म्हणावी तशी घट झालेली नाही.

शिरोळ तालुक्‍यातील पूरस्थितीही कायम आहे. शिरोळमध्ये पुरामुळे स्थलांतरित झालेल्या लोकांना आजही हेलिकॉप्टरद्वारे खाद्यपदार्थासह जीवनावश्‍यक वस्तूंचा पुरवठा करण्यात आला. 
जिल्ह्यात आज सकाळी संपलेल्या २४ तासांत सरासरी १८.३७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. गगनबावडा तालुक्‍यात सर्वाधिक ५५ तर शिरोळ तालुक्‍यात सर्वात कमी ३.४३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. आतापर्यंत जिल्ह्यात सरासरी २११९.३४ मिलिमीटर पाऊस झाला. सातारा जिल्ह्यातील कोयना धरणासह जिल्ह्यातील सर्व धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत. राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे बंद झाले आहेत.  
महामार्गासह इतर मार्ग खुले
दरम्यान, गेल्या आठ दिवसांपासून पुराच्या पाण्याखाली असलेला पुणे-बंगळूर महामार्ग आज सुरू करण्यात आला. सकाळी एकेरी तर सायंकाळनंतर दुतर्फा वाहतूक सुरू झाली. सकाळच्या सत्रात या मार्गावरून पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडरसह इतर जीवनावश्‍यक वस्तूंचा पुरवठा करणारी वाहने शहरात आणण्यात आली. या मार्गाशिवाय कोल्हापूरहून पुणे, पणजी, इचलकरंजी, कोडोली आदी मार्गावरील वाहतूकही सुरू झाली. जिल्ह्यातील ८४ बंधारे अजूनही पाण्याखाली असून यावरील वाहतूक काही ठिकाणी पूर्णपणे बंद तर काही ठिकाणी पर्यायी मार्गाने सुरू आहे. 

रेल्वे वाहतूक

अद्यापही रूकडी येथे पुराचे पाणी धोक्याच्या पातळीवर असल्याने कोल्हापूरकडे जाणारा रेल्वे मार्ग अद्यापही बंद आहे. सर्व एक्स्प्रेस गाड्या मिरजेतून सुटून मिरजेपर्यंतच येत आहेत. मिरज - पुणे रेल्वे सुरू आहे. पॅसेंजर गाडी रूकडीपर्यत सोडण्यात येत आहे. 

चंदगड तालुक्यातील हे मार्ग वाहतुकीसाठी खुले

चंदगड - गडहिंग्लज , चंदगड -बेळगाव, चंदगड - तिलारीनगर, पाटणे फाटा - तिलारीनगर हे सर्व मुख्य मार्ग वाहतुकीसाठी खुले झालेत .

एसटी वाहतूक सुरू झालेले मार्ग
कोल्हापूर- गारगोटी, कोल्हापूर- गडहिंग्लज- संकेश्‍वर, कोल्हापूर- वारणा कोडोली, कोल्हापूर- हुपरी, कोल्हापूर- आजरा, कोल्हापूर- कागल, कोल्हापूर- पुणे- मुंबई

दृष्टिक्षेपात
० पुणे-बंगळूर महामार्ग वाहतुकीसाठी खुला
० महामार्गावरून इंधनासह जीवनावश्‍यक वस्तूंची वाहने शहरात
० शहरातील बहुतांश पंपांवर इंधनपुरवठा सुरू, वाहनधारकांच्या लांबच लांब रांगा
० शहरातील गॅसपुरवठाही होतोय सुरळीत
० शिरोळमधील काही गावांना बेटाचे स्वरूप 
० तेथील दीड लाख तर जिल्ह्यातील अडीच लाख लोक छावण्यांमध्ये
० अलमट्टीतून ५ लाख ४० हजार क्‍युसेक विसर्ग
० शहरातील पाणी ओसरलेल्या भागात स्वच्छता मोहीम सुरू
० शहरातील अनेक भागात अजूनही पुराचे पाणी घुसलेलेच 
० पूरग्रस्तांना विविध संस्थांकडून मदतीचा ओघ सुरूच
० चिखली, आंबेवाडीला पुराचा वेढा कायम
० मृत जनावरे नदीकाठावर, दुर्गंधीचे साम्राज्य
० ‘गोकुळ’चे दूध संकलन घटलेलेच 
० कोल्हापूर-रत्नागिरी मार्ग अजूनही बंदच
० गगनबावडा मार्गावरही रस्त्यावर अजून पाणी
० कोल्हापूर-राधानगरी मार्गावर हळदीजवळ रस्ता बंद

राधानगरी धरणाचे सर्व दरवाजे बंद
अखेर रविवार (ता. ११)पासून पावसाने पूर्ण उघडीप दिल्याने राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे बंद झाले. शिवाय, मेन गेटही बंद केल्याने पूर्ण विसर्ग थांबला आहे. यामुळे भोगावती नदीचे पाणी झपाट्याने असल्याने मार्गही आजपासून वाहतुकीसाठी खुले झाले. या परिसरातील जनजीवन आता पूर्वपदावर येत आहे.

Vertical Image: 
English Headline: 
Kolhapur Floods follow up story
Author Type: 
External Author
सकाळ वृत्तसेवा
Twitter Publish: 
Send as Notification: