महाविकास आघाडी सरकारमधील ४२ पैकी २६ मंत्र्यांना कोरोना लागण

महाविकास आघाडी सरकारमधील ४२ पैकी २६ मंत्र्यांना कोरोना लागण

महाविकास आघाडी सरकारमधील


४२ पैकी २६ मंत्र्यांना कोरोना लागण


मुंबई / वृत्तसेवा

 

राज्यातील सर्वसामान्य नागरिकच कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत असे नाही तर त्याचा फटका राज्यातील  महाविकास आघाडी सरकारमधील ६० टक्के मंत्र्यांना बसला आहे. ठाकरे सरकारमधील ४३ पैकी २६ मंत्री आतापर्यंत कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे काल सोमवारी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहेत.

राज्यात राष्ट्रवादीच्या एकूण १६ पैकी १३ मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली आहे. याशिवाय काँग्रेसच्या ७ आणि शिवसेनेच्या ५ मंत्र्यांना आतापर्यंत कोरोना झाला आहे. राज्याचे जलसंधारण मंत्री जयंत पाटील, आरोग्यमंत्री राजेश टोपे, अन्न आणि औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे, बच्चू कडू आदी मंत्र्यांना यापूर्वी कोरोना झाला होता. याशिवाय उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, श्रम मंत्री दिलीप वळसे पाटील यांनाही यापूर्वी कोरोनाची लागण झाली होती.