कोरोना लस घेतल्यानंतर एकाचा मृत्यू

कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतर एकाचा मृत्यू झाला. रेठरे बुद्रुक ता. कराड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ही धक्कादायक घटना घडली. लस टोचल्यानंतर दहा मिनिटात संबंधित व्यक्तीला चक्कर आली. त्यानंतर उपचारासाठी हॉस्पिटलला नेण्यात येत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

कोरोना लस घेतल्यानंतर एकाचा मृत्यू
संग्रहित फोटो

कोरोना लस घेतल्यानंतर एकाचा मृत्यू 

रेठरे बुद्रुक प्राथमिक आरोग्य केंद्रातील घटना : ग्रामीण पोलीसात आकस्मिक मृत्यूची नोंद 

कराड /प्रतिनिधी
           कोरोना प्रतिबंधक कोव्हिशिल्ड लस घेतल्यानंतर एकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. 

           रेठरे बुद्रुक ता. कराड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ही घटना घडली.  शुक्रवारी 16 रोजी रेठरे बुद्रुक येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना प्रतिबंधक कोव्हिशिल्ड लस टोचल्यानंतर दहा मिनिटात लस घेणाऱ्या व्यक्तीला चक्कर आली. त्यानंतर संबंधित व्यक्तीला उपचारासाठी कराड (मलकापूर) येथील कृष्णा हॉस्पिटलला नेण्यात येत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. 
          संपत राजाराम जाधव (वय ५९) रा. रेठरे बुद्रुक ता. कराड असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. दरम्यान, कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून या घटनेची नोंद झाली आहे. पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा केला असून शवविच्छेदनासाठी मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.