कोरोनाचे कराडला आणखी दोन धक्के ,जिल्ह्याची रेडझोन कडे वाटचाल

दोनजण कोरोना पॉझिटिव्ह. जिल्हा एकूण कोरोना पॉझिटिव्ह १६ तर कराड तालुक्यात ८ रुग्ण,दोन नवीन बाधित रुग्ण मलकापूर (आगाशिवनगर) , वनवासमाची येथील असल्याची माहिती मिळत आहे.

कोरोनाचे कराडला आणखी दोन धक्के ,जिल्ह्याची  रेडझोन कडे वाटचाल

कराडला आणखी दोन धक्के , जिल्ह्याची रेडझोन कडे वाटचाल
 

दोनजण कोरोना पॉझिटिव्ह. जिल्हा एकूण १६
 मलकापूर (आगाशिवनगर) , वनवासमाची

सातारा जिल्ह्यात १६ कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत.यापैकी एकट्या कराड तालुक्यात ८ जण आढळून आल्याने कराड तालुक्याची चिंता वाढली आहे.

बाबरमाची परिसरातील रूग्णांच्या संपर्कात आल्याने
वनवासमाची व आगाशिवनगर येथील दोघांना कोरोनाची बाधा झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
त्यामुळेच एकट्या कराड तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या ८ झाली असून सातारा जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या १६ इतकी झाली आहे.बाधित रुग्णांची संख्या रेड झोन चा आकडा पार करून पुढे गेली आहे.

 

*कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथील दोन अनुमानितांचे रिपोर्ट आले पॉझिटिव्ह एका अनुमानिताचा रिपोर्ट निगेटिव्ह तर 68 जणं विलगीकरण कक्षात दाखल*

सातारा दि.21 (जि.माका) : 38 पुरुष व 25 वर्षीय युवकाला कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे कोरोना बाधिताच्या निकट सहवासित म्हणून विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले होते. या दोघांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून हे दोघेही कोरोना बाधित (कोविड-19) असल्याचे बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांनी कळविले आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.   या दोन कोरोनाबाधित रुग्णांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर नियमानुसार निगराणीखाली उपचार सुरु आहेत.
तसेच क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 1 अनुमानित निगेटिव्ह असल्याचे बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांनी कळविले आहे. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे 19, कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे 13, उपजिल्हा रुग्णालय, कराड येथे 14, उपजिल्हा रुग्णालय, फलटण येथे 13, ग्रामीण रुग्णालय, कोरेगाव येथे 9 असे एकूण 68 नागरिकांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. 
   या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.