'आवडत्या' अधिकाऱ्यांच्या मोक्याच्या ठिकाणी 'अर्थपूर्ण' तडजोडीने बदल्या :- महेशकुमार जाधव

'आवडत्या' अधिकाऱ्यांच्या मोक्याच्या ठिकाणी 'अर्थपूर्ण' तडजोडीने बदल्या :- महेशकुमार जाधव
निवेदन देताना भाजप कराड उत्तर अध्यक्ष महेश कुमार जाधव व पदाधिकारी

उंब्रज/प्रतिनिधी

महाविकास आघाडी सरकारने कोट्यावधीच्या घोटाळ्यातील वाधवानला परवानगी देणाऱ्या अमिताभ गुप्ताला क्लिनचीट दिली आहे.शासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या न करण्याचा शासन आदेश जारी असताना मुख्यमंत्र्यांनी अर्थपूर्ण तडजोडी करून आवडत्या अधिकाऱ्यांना मोक्याची शासकीय कार्यालये दिली आहेत. यासाठी त्यांनी 'त्या' कामांचा सपाटा लावला आहे. राज्यातील पोलिसांच्या वरील हल्ल्याचे प्रमाण वाढले आहे केंद्र सरकारने राज्य सरकारला कोविंड १९ च्या विरोधात लढण्याकरिता जे पैसे दिले आहेत ते नक्की कुठे व कसे खर्च होत आहेत? याची माहिती जनतेला देणे आवश्यक बनले आहे.यासह विविध मागण्याचे निवेदन कराड उत्तर भाजप अध्यक्ष महेशकुमार जाधव यांनी कराड तहसीलदार यांना दिले आहे.

शेतकऱ्यांच्या बाबत फसव्या घोषणा देऊन त्यांचे पुरते हाल चालवले आहेत.मजूर, कामगार, महिला, दिव्यांग यासह सर्वसामान्य नागरिकांसाठी कोणतेही पॅकेज राज्य सरकारने दिलेले नाही सद्य परिस्थितीला राज्यकर्ते स्वतःच्या फायद्यात मग्न आहेत.या सरकारच्या कामाचा भारतीय जनता पार्टीचे कराड उत्तर तालुकाध्यक्ष महेश कुमार जाधव यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे. तसेच महाराष्ट्रातील सर्व सामान्य लोकांकरिता आर्थिक पॅकेजची घोषणा करावी अशी मागणी दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

यावेळी कराड उत्तर भाजपाचे अध्यक्ष महेशकुमार जाधव समवेत जिल्हा सरचिटणीस महेंद्रकुमार डुबल,ओबीसी जिल्हा अध्यक्ष विशाल शेजवळ, दिगंबर सुर्यवंशी व पदाधिकारी उपस्थित होते.