परप्रांतीय युवकांना उंब्रजकरांचा मदतीचा हात ; तळबीड पोलिसांकडून गुन्हेगारांसारखी वागणूक, कारवाईची मागणी

कोरोना आजाराच्या धास्तीने व देशातील लॉकडाऊन स्थितीने जनजीवन पुरतेच  विस्कळीत झाले आहे. अत्यावश्यक कारणाशिवाय कोणीही घराबाहेर पडू नये, शासन आपणाला सर्व सेवासुविधा घरपोच देण्यासाठी प्रयत्न शील आहे आदी आश्वासने केंद्रातील आणि राज्यातील सरकारकडून देण्यात येत आहेत.प्रत्यक्षात या आश्वासनांची पूर्तता कोठेही होताना दिसत नाही. परिणामी आता केंद्र व राज्य सरकारच्या या घोषणाबाजीला प्रशासकीय यंत्रणे कडूनच ठेंगा दाखविला जात असल्याचे दिसत आहे.

परप्रांतीय युवकांना उंब्रजकरांचा मदतीचा हात ;  तळबीड पोलिसांकडून गुन्हेगारांसारखी वागणूक, कारवाईची मागणी

उंब्रज / प्रतिनिधी

कोरोना आजाराच्या धास्तीने व देशातील लॉकडाऊन स्थितीने जनजीवन पुरतेच  विस्कळीत झाले आहे. अत्यावश्यक कारणाशिवाय कोणीही घराबाहेर पडू नये, शासन आपणाला सर्व सेवासुविधा घरपोच देण्यासाठी प्रयत्न शील आहे आदी आश्वासने केंद्रातील आणि राज्यातील सरकारकडून देण्यात येत आहेत.प्रत्यक्षात या आश्वासनांची पूर्तता कोठेही होताना दिसत नाही. परिणामी आता केंद्र व राज्य सरकारच्या या घोषणाबाजीला प्रशासकीय यंत्रणे कडूनच ठेंगा दाखविला जात असल्याचे दिसत आहे.

देशात लॉकडाऊन स्थिती असताना कोरोना सारख्या महामारीच्या आजाराला नियंत्रणात आणण्यासाठी शासन विविध निर्णय घेत आहे. शासनाच्या या निर्णयांमुळे कही खुशी कहीं गम चे वातावरण निर्माण झाले आहे.  कोरोना हा संसर्गजन्य आजार असल्याने प्रशासनाने वाहतूकीच्या नियमांचे विविध बंधन घालून प्रवाशी वाहतुकीला बंदी घातली आहे. परिणामी सध्या परिसरातील महामार्गावर केवळ अत्यावश्यकच्या चौकटीत असलेलीच वाहने ये -जा करताना दिसत आहेत. इतर सर्व प्रकारची वाहतूक बंद असल्याने लोकांना आपल्या घराकडे परतण्यासाठी अनेक अडचणींना सामना करावा लागत आहे.

दरम्यान सोमवार दि.३० रोजी दुपारी एकच्या सुमारास वाहनाअभावी शेकडो परप्रांतीय युवक, महिला कराड बाजूकडून सातारा बाजूकडे जाताना पायी चालत जाताना परिसरातील नागरिकांना दिसून आले. त्यांच्याशी स्थानिक नागरिकांनी याबाबत संपर्क साधला असता धक्कादायक वास्तव समोर आले. हे परप्रांतीय युवकांकडून बेंगलोर मधील आमचे काम बंद झाल्याने आमच्या वर उपासमारीची वेळ आल्याने आम्ही घराकडे जाण्यासाठी जात असल्याचे सांगण्यात आले.तसेच ग्वाल्हेर मधून बेंगलोरला पाठविण्यात आलेला टेंम्पो सदर लोकांना न घेताच परत रिकामा पाठवल्याचे त्यांनी सांगितले. काम नसल्याने किती दिवस उपासी बसणार त्यापेक्षा परतीचा मार्ग स्विकारून ग्वाल्हेर कडे जाण्यासाठी प्रवास सुरू केला आहे असे सांगितले. गेल्या आठवडय़ात सुरू केलेल्या या प्रवासात मिळेल तेथे खाल्ले नाही मिळाले तर चालले.. अशी अवस्था होऊन बसलेले लोक डोळ्यातील अश्रू पुसत आपली कहाणी कथन करत होते. हे ऐकून दक्ष नागरिकांना ही गहिवरून आले.तर तासवडे टोल नाक्यानजीक आलेल्या त्या परप्रांतीयांना पोलिसांकडून गुन्हेगारी स्वरूपाची वागणूक मिळून काठीचा मार ही खावा लागला त्यावेळी पोलीस प्रशासनाकडून मिळणाऱ्या या गुन्हेगारी स्वरूपाच्या वागणुकीवर नाराजी व्यक्त केली.दरम्यान, उंब्रज गावच्या हद्दीत आल्यानंतर सदर परप्रांतीयांची पोलिसांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर येथील रोटरी क्लबचे अध्यक्ष कमलाकर पाटील व रोटरीयन यांनी क्षणाचा विलंब न करता मिळेल ते अल्पोपाहाराचे खायचे साहित्य पाणी त्यांना तत्काळ उपलब्ध करुन दिले आणि त्यांच्या स्वाधिन करून पुढील प्रवासाठी त्यांना मार्गस्थ केले.

 


तळबीड पोलिसांकडून गुन्हेगारांसारखी वागणूक.. 

परप्रांतीय युवक आपले सहकारी, कुटूंबियांसमवेत घराकडे जाण्यासाठी निघाले असताना कराड तालुक्यातील तासवडे टोलनाका परिसरात आले असताना तेथील उपस्थित पोलिसांनी हातातील दांडक्याने मारहाण करून जखमी केल्याच्या खुणा त्यांनी उपस्थितांना दाखविल्या. मदत राहू द्या पण वागणूक तरी चांगली द्या अशी माफक अपेक्षा परप्रांतीयांनी उपस्थितांसमोर व्यक्त केली. तळबीड पोलिसांकडून परप्रांतीयांना मिळालेल्या अपमानास्पद व गुन्हेगारीसारख्या वागणूकीबद्दल उपस्थितांनी नाराजी व्यक्त केली. जिल्हा पोलिस प्रमुखांनी दंडुकेशाही करणार्‍या तळबीड पोलिसांवर कडक कारवाई करावी अशी मागणी उपस्थित नागरिकांनी यावेळी केली.