सिर सलामत तो पगडी पचास,मीही पॅकेज तुम्हाला देतो, पण आधी परिस्थिती सांभाळू द्या.:-मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

सिर सलामत तो पगडी पचास,मीही पॅकेज तुम्हाला देतो, पण आधी परिस्थिती सांभाळू द्या.:-मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लाईव्ह मधील 65 मुद्दे 

1. मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा; ईद साजरी करा, पण रस्त्यावर उतरू नका
2. कोरोनासोबत जगाचं म्हणजे काय करायचं हे आपल्याला शिकावं लागेल
3. मला हुकूमशाह झाल्यासारखं वाटतं, तरीही तुम्ही घराबाहेर पडू नका, सुरक्षित राहा
4. महाराष्ट्राच्या जनतेने शिस्त पाळल्यामुळे रुग्णांची आकडेवारी कमी झाली
5. एक 90 वर्षाच्या आजी कोरोनातून बऱ्या होऊन घरी गेल्या, हे आपलं यश आहे.
6. याच्या पुढची लढाई आपल्यासाठी महत्वाची आहे.
7. येत्या काही दिवसांमध्ये राज्यातील रुग्णांची आकडेवारी वाढेल.
8. इतर राज्यांकडे बघण्यापेक्षा आपण काय करतोय, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
9. कसं मुंबई आणि महाराष्ट्राने या संकटावर मात केली, याचं रेकॉर्डिंग झालं पाहिजे
10. पुढच्या महिन्यात 13-14 हजार बेड्स अजून उपलब्ध होतील.
11. अनेक डॉक्टर, नर्सेस स्वत:हून पुढे येत आहेत.
12. अनेक रक्तदात्यांनी रक्तदान केल्यामुळे आम्ही काहीसं यश मिळवलं; पण आता पुन्हा रक्तदानाची गरज आहे. राज्यात रक्ताची अवशक्यता आहे. अनेक रक्तदात्यांनी पुढे यावं ही विनंती आहे.
13. आपल्यासमोर पावसाळ्याचं मोठं आव्हान असणार आहे, त्याच्यासोबत येणाऱ्या साथींच्या आजाराचे संकटही येईल.
14. आपल्याला आता सगळ्या आजारांपासून लांब राहाणे गरजेचे आहे. कारण इतर आजारांपासून लांब राहाणे म्हणजे कोरोनापासून लांब राहाणे होय.
15. सर्दी, खोकला, ताप अशा आजारांपासून लांब राहाणे गरजेचे आहे. शिंकताना, खोकताना तोंडावर मास्क लावणे गरजेचे आहे.
16. अनेक आजार आले, ताप आला, तर अंगावर काढू नका, लगेचच डॉक्टरांकडे जा, हीसुध्दा कोरोनाची लक्षणे असू शकतात.
17. लक्षणे दिसताच तुम्ही डॉक्टरांकडे या, राज्यातले जे मृत्यू झालेत, ते शेवटच्या टप्प्यात डॉक्टरांकडे आल्यामुळे झालेत.
18. राज्यातले अनेक डॉक्टर प्रयत्नांची पराकष्टा करत आहेत, जगातल्या अनेक डॉक्टरांशी संपर्क साधत आहेत.
19. आपल्याला सगळं वेळेत मिळत आहे, मात्र पेशंट वेळेत येणे गरजेचे आहे.
20. मला एका गोष्टीचा अभिमान वाटतो की गावाकडील सगळी परिस्थिती आटोक्यात येत आहेत.
21. कोव्हिड आणि नॉन कोव्हिड अशी वेगळी हॉस्पिटले केली आहेत.
22. परदेशातील मराठी डॉक्टरांशी संपर्क झाल्यानंतर त्यांनी महाराष्ट्रातील प्रयत्नांचे कौतूक केले.
23. तुम्ही सगळेच जण खरे योध्दे आहात.
24. मीही पॅकेज तुम्हाला देतो, पण आधी परिस्थिती सांभाळू द्या.
25. गोरगरिबांना आणि ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाही, अशांनादेखील आम्ही धान्य देतो.
26. लाखांच्या वर आपण 5 रुपयात शिवभोजन थाळी देत आहोत.
27. आपण सगळ्या व्यवस्था गरिब, श्रीमंतांसाठी करत आहोत.
28. महात्मा जोतिबा फुले योजनेअंतर्गत अनेक रुग्णालयांमध्ये 100 टक्के मोफत उपयार देत आहोत.
29. राज्याने आतापर्यंत 481 ट्रेन श्रमिकांसाठी आणि इतर नागरिकांसाठी सोडल्या आहेत.
30. राज्य सरकारने 85 कोटी रुपये ट्रेन प्रवाशांसाठी दिले आहेत.
31. आपण रोज 80 ट्रेन केंद्राकडे मागत आहोत, मात्र आम्हाला फक्त 30 ते 40 ट्रेन मिळत आहेत.
32. परप्रांतिय जातानादेखील महाराष्ट्राचं कौतुक करत आहेत.
33. एसटीदेखील महत्वाचं काम करत आहे.
34. रस्त्यावरून भटकंती करत जाताना एसटीने त्यांना जिथे जायचं होतं, तिकडे घेऊन जात आहेत.
35. एसटीच्या आतापर्यंत 3 लाख 80 हजार मजूरांना त्यांच्या सिमेच्या ठिकाणी पाठवलं आहे.
36. राज्याने एसटी प्रवासासाठी 85 लाख रुपयांचा खर्च केला आहे.
37. आम्हाला हे बंद असलेलं राज्य सुरू करायचं आहे, पण खबरदारी घेऊन करायचं आहे.
38. येणारे सिजन हे शेतीसाठी आणि शिक्षणासाठी महत्वाचे आहे.
38. महाराष्ट्राचं अर्थचक्र सुरू करण्यासाठी अनेक व्यवसाय सुरू करण्यात आले आहेत, लाखांच्या वर तिथे लोक काम करत आहेत.
39. ग्रीन जिल्ह्यांमध्ये बस सेवा सुरू करण्यात आली आहे.
40. राज्यातल्या राज्यातील लोकांसाठी प्रवासासाची सुरूवात करत आहोत.
41. पुढच्या 15 दिवसांमध्ये राज्याचं खरं चित्र समोर येईल.
42. आपण कुठे जाणार, कसं जाणार याची नोंद घेऊन प्रवासाची मुभा देणार आहोत.
43. चित्रिकरण सुरू करण्यासाठी आम्ही परवाणगी दिली आहे.
44. आऊटडोअर खेळ कसे सुरू करता येईल, याचाही विचार आपण करत आहोत.
45. शेतकऱ्याला बांधावर बिबियाणे कसं उपलब्ध करून देता येईल, याचा विचार करत आहोत.
46. कापूस खरेदीचा विचार आपण करत आहोत. उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडासाठी आमचा विचार सुरू आहे.
47. हे सगळं करत असताना आम्ही आरोग्याचा विचारदेखील करत आहोत.
48. सिर सलामत तो पगडी पचास
49. कोकणात व्हायरोलॉजी लॅब आणि टेस्टिंग सुरू करतोय.
50. सगळ्या शेतकऱ्यांना आपण आधार देत आहोत आणि आधार देणार आहोत.
51. हा संकटाचा काळ आहे, कोणीही राजकारण करू नये.
52. तुम्ही केलात म्हणून आम्ही राजकारण करणार नाही.
53. मी प्रामाणिकपणाने काम करतोय, महाराष्ट्र सरकार प्रामाणिकपणाने काम करतय.
54. काही उणिवा केंद्राकडून भासत आहेत, केंद्राकडून अजून काही राज्याचे पैसे येणे बाकी आहेत, मी बोंब मारू का?
55. अडचणीच्या वेळेत राजकारण करणे, हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभत नाही.
56. अचानक लॉकडाऊन करणे आणि अचानक लॉकडाऊन उठवणं म्हणजे पायावर कुऱ्हाड मारून घेणे होय.
57. लॉकडाऊन हा शब्द वापरू नका, हळू हळू सगळ्या गोष्टी ओपन करत आहोत.
58. पुढचे काही दिवस मास्क आपल्याला वापरावाच लागेल.
59. कोरोना हा कदाचित चांगल्या गोष्टी शिकवेल. या कोरोनाने आपण पॉजिटिव्हने बघूया.
60. कोरोनाचं सकंट जाईल, पण त्यानंतर दुसरा आजार आला तर?
61. मुंबईमध्ये हळू हळू आपण अनेक दुकाने उघडत जात आहोत.
62. सरकारने परवाणगी दिल्यानंतर गर्दी करू नका. गर्दी झाली की मी पुन्हा बंद करणार
63. जे आयुष्य सुरळीत आणि सुरक्षित सुरू आहे, तशीच सुरू ठेवा.
64. आपण सर्व धर्मियांनी आजपर्यंत जे सहकार्य करत आहात, ते सथेच असू द्या.
65. आपल्या सगळ्यांनी आपल्या देवाकडे पुन्हा एकदा सगळं सुरळीत होईल, यासाठी प्रार्थना करा.