भारतात लॉकडाउन ३मे पर्यत

भारतात लॉकडाउन ३ मे पर्यत वाढविले आहे याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले आहे

भारतात लॉकडाउन ३मे पर्यत

लॉक डाउन ३ मे पर्यत वाढवले असून नियम अधिक कठोर केले आहेत तसेच २० एप्रिल नंतर आढावा घेऊन काही ठिकाणी शिथिलता येऊ शकते परंतु नियम मोडणाऱ्या ठिकाणी कठोर उपाययोजना केल्या जातील

 

२०० पेक्षा जास्त लॅब कार्यरत आहेत भारतात १ लाखापेक्षा जास्त बेड तयार केलेत ६०० पेक्षा जास्त हॉस्पिटल फक्त कोरोना साठी तयार केले आहेत असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मोठी घोषणा
नवी दिल्ली – देशात दिवसेंदिवस कोरोनाचा कहर वाढताना दिसत आहे. देशातील कोरोनाचा प्रकोप थांबवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात 21 दिवसांसाठी लॉकडाऊनची घोषणा केली होती. आज या लॉकडाऊनचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी काय बोलणार याकडे संपूर्ण देशवासीयांचे लक्ष लागलेले होते आणि अपेक्षेप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील कोरोना बाधितांच्या आकड्यात होणारी वाढ पाहता देशातील लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णण घेतला असून देशात आता 03 मेपर्यंत लॉकडाऊन कायम राहणार आहे.
पुढे बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, भारतातील कोरोनाची लढाई ही मोठ्या हिंमतीने सुरू असून आपल्या सर्वांच्या सहकार्याने आजपर्यंत कोरोनाला रोखण्यात भारताला मोठे यश आले आहे. देशातील जनतेने मोठे कष्ट सहन करून देशाला या महामारीपासून वाचवले आहे. प्रत्येक देशवासीय एका सैनिकाप्रमाणे लढत आहे.
भारतात 550 रूग्ण असताना लॉकडाऊनचे मोठे पाऊल उचलले. भारताने समस्या वाढण्याची वाट न पाहता योग्य वेळी योग्य निर्णय घेत कोरोनाला रोखण्याचा प्रयत्न केला. आपल्याला सोशल डिस्टन्सींग व लॉकडाऊनचा मोठा फायदा झाला. आर्थिकदृष्ट्या खूप मोठी किंमत मोजावी लागली असली तरी देशवासीयांच्या आयुष्यापुढे याची तुलना होवू शकत नाही. अपुरी संसाधने असतानाही भारताने जी पावले उचलली त्याची संपूर्ण जगात प्रशंसा होणे स्वाभाविक आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वच राज्यातील मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला, अनेकांचे तज्ञांचे मत पाहता भारतात 03 मे पर्यंत लॉक डाऊन वाढवण्याचा निर्णय घेण्यात येत असून या काळातही नागरिकांनी आतापर्यंत केले तसेच सहकार्य कायम करावे असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. यापुढील एका आठवड्यासाठी कोरोनासाठीची लढाई अधिक तीव्र करण्यात येणार असून 20 एप्रिलपर्यंत लॉकडाऊनचे पालन कसे होत आहे यावर बारकाईने लक्ष ठेवण्यात येणार असून त्याचा सतत अहवाल घेण्यात येणार असल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली. देशातील ज्या भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही त्या भागात 20 एप्रिलनंतर काही प्रमाणात लॉकडाऊनमध्ये सवलत दिली जावू शकते. परंतु यासाठी कठोर नियमावली राहणार आहे.

यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना काय म्हणाले होते ते थोडक्यात…

मागील महिन्यात 19 मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करत 22 मार्च रोजी सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत ’जनता कर्फ्यू’ची घोषणा केली होती. पंतप्रधान देशातील सर्व जनतेला आवाहन करताना म्हणाले होते की, 22 मार्च संध्याकाळी 5 वाजता कोरोना व्हायरसशी लढणार्‍यांना मदत करणार्‍या डॉक्टरांसह मेडिकल टीमचे आभार मानण्यात येतील. त्यांचे आभार मानण्यासाठी टाळ्या, थाळ्या किंवा घंटानाद करा.
त्यानंतर 24 मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला संबोधित करून 25 मार्च ते 14 एप्रिलपर्यंत देशात 21 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली होती.
तसेच 3 एप्रिल रोजी मोदी यांनी एक व्हिडीओ संदेश जारी केला होता. त्यामधून 5 एप्रिल रोजी रात्री 9 वाजता 9 मिनिटांसाठी घरातील सर्व लाइट्स बंद करून दिवे, मेणबत्ती. मोबाईल फ्लॅशची लाइट लावून कोरोनाला हरवण्यासाठी देशातील एकतेचं प्रदर्शन करण्याचं आवाहन केलं होतं.