वाइन शॉप,परमिट रूमचा क्लोजिंग स्टॉक हिटलिस्टवर राज्य उत्पादन शुल्कच्या भूमिकेकडे नजर

दारू विक्रेते होलसेलर तसेच परमिट रूम, वाईन शॉप चालक यांचा नाव आणि गावासाहित असणारा क्लोजिंग स्टॉक राज्य उत्पादन शुल्क विभागाने जाहीर करण्याची आवश्यकता आहे.कोरोना लॉक डाउन काळात अवैध दारू विक्रीचा सुळसुळाट तालुक्यातील सर्वच ठिकाणी झाला असून राज्य उत्पादन शुल्क विभागाचे झारीतील शुक्राचार्य कार्यरत झाले आहेत स्टॉक तपासणीत गोलमाल करून प्रचंड प्रमाणात आर्थिक तडजोडी होण्याची शक्यता असल्याची कुजबुज लोकांच्यात आहे.

वाइन शॉप,परमिट रूमचा क्लोजिंग स्टॉक हिटलिस्टवर  राज्य उत्पादन शुल्कच्या भूमिकेकडे नजर

वाइन शॉप,परमिट रूमचा क्लोजिंग स्टॉक हिटलिस्टवर

राज्य उत्पादन शुल्कच्या भूमिकेकडे नजर

अनिल कदम/उंब्रज

दारू विक्रेते होलसेलर तसेच परमिट रूम, वाईन शॉप चालक यांचा नाव आणि गावासाहित असणारा क्लोजिंग स्टॉक राज्य उत्पादन शुल्क विभागाने जाहीर करण्याची आवश्यकता आहे.कोरोना लॉक डाउन काळात अवैध दारू विक्रीचा सुळसुळाट तालुक्यातील सर्वच ठिकाणी झाला असून राज्य उत्पादन शुल्क विभागाचे झारीतील शुक्राचार्य कार्यरत झाले आहेत स्टॉक तपासणीत गोलमाल करून प्रचंड प्रमाणात आर्थिक तडजोडी होण्याची शक्यता असल्याची कुजबुज लोकांच्यात आहे.

सातारा जिल्ह्यातील सर्वच पोलीस ठाण्यात पकडलेला दारूचा साठा, दारू बाटली वर असणारा बॅच नंबर यावरून खात्री करून याची इत्यंभूत माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला निश्चितच असते परंतु चिरीमिरी उकळण्यासाठी थातुरमातुर कारवाई दाखवली जाते,खरे पाहता सर्वच दारू विक्रेते हे गलेलठ्ठ कमाई करून सरकारच्या डोळ्यात धूळफेक करण्यात माहीर आहेत.प्रशासनातील काही फितूर सरकारी बाबू दारू धंदे करणारांचे चोचले पुरवीत असतात यामुळे सरकारच्या उत्पनाला तर चुना लागतोच परंतु दारू विक्री करणारा करणारा पैशाच्या जोरावर प्रशासनाला आपल्या तालावर नाचवत असतो.

तालुक्यातील बऱ्याच गावात बोगस आणि डुप्लिकेट तसेच गोवा बनावटीच्या दारूचा सुळसुळाट झाला आहे.अवैध मार्गाने अथवा आर्थिक साटेलोटे करून अशी आरोग्यासाठी अपायकारक असणारी दारू परराज्यातुन निर्धोक पणे उजळ माथ्याने विकली जात असून सुद्धा राज्य उत्पादन शुल्क विभाग डोळ्यावर पट्टी बांधून शांत कसा काय याबाबत लोकांच्यात उलटसुलट चर्चा चालू आहे.सेम टू सेम दारू बाटली व त्यामध्ये असणारी डुप्लिकेट दारू ही आरोग्यासाठी अपायकारक असून यामुळे जीवित हानी सुद्धा होऊ शकते मात्र आर्थिक तडजोडीला चटावलेली यंत्रणा सोयीस्करपणे सर्व बाबीकडे डोळेझाक करण्यात माहीर असल्याने 'आंधळं दळतंय...'अशी अवस्था होऊन बसली आहे.

राष्ट्रीय महामार्गालागत परवानगी दिलेले जवळपास सर्वच परमिट रम बिअर बारमध्ये नियमांची पायमल्ली झाल्याचे दिसते अंतराच्या निर्बंधाला पद्धतशीर कायद्याच्या चौकटीत बसवून दारू विक्रेत्यांचा उदोउदो केला आहे तसेच अनेक हॉटेल चालक कोणताही दारू विक्रीचा परवाना नसताना उजळ माथ्याने दारू विक्री करत असून सरकारच्या नियमाला हरताळ फासत आहेत. यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने सदसद्विवेकबुद्धी ने काम करण्याची गरज असून बेकायदेशीर दारू विक्री करणाऱ्याला पाठीशी न घालता त्याच्यावर कठोर कारवाईचा बडगा उगारला पाहिजे.