सातारा जिल्ह्यात लालपरी शुक्रवार पासून धावणार

सातारा जिल्ह्यात लालपरी शुक्रवार पासून धावणार

मल्हारपेठ प्रतिनिधी /विकास कदम 


कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावामुळे देशभरात लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. संपूर्ण जग कोरोना व्हायरसशी लढा देत आहे. परिणामी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सरकारने बंद करण्याचा निर्यय घेतला. मात्र आता काही ठिकाणी लॉकडाऊन हळूहळू शिथिल केला जात आहे. तर काही ठिकाणी सूट दिली जात आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा कणा असलेली एसटी बसही आता काही जिल्ह्यामध्ये सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. २३ मार्च नंतर म्हणजेच जवळ जवळ ५९ दिवसानंतर सातारा जिल्ह्यातील लालपरी महाराष्ट्र शासनाने दिलेल्या निर्देशानुसार तालुक्याचे ठिकाण ते जिल्ह्याच्या ठीकाणापर्यंत तसेच जिल्ह्यातील महत्वाच्या शहरापर्यंत उद्यापासून पासून काही प्रमाणात रा.प. वाहतूक करण्यात येत आहे.

जिल्ह्यातून एकूण ११ आगारातून एकूण ८८ फेऱ्या होतील. आगारनिहाय फेऱ्या या तालुकानिहाय सातारा ४, कराड २, कोरेगाव ६, फलटण १३, वाई ६, पाटण ११, दहिवडी ०८, महाबळेश्वर ११, मेंढा ४, खंडाळा ८, वडूज १२ अशा फेऱ्या असणार आहेत. त्याचबरोबर बसेसच्या क्षमतेपेक्षा ५० टक्केच म्हणजे २२ प्रवासी एका बसेस मधून प्रवास करू शकतील.या सर्व बसेस जिल्हा अंतर्गत वाहतूक करणार आहेत. तसेच सर्व प्रवाशांना मास्क बांधणे बंधनकारक आहे.बसमध्ये चडन्यापूर्वी सिनेटायझरने हात धुणे आवश्यक आहे. एक फेरी पूर्ण झाल्यानंतर बस स्वच्छ केली जाणार आहे. अशी माहिती विभाग नियंत्रक रा.प.सातारा यांनी दिली आहे.