कोरोना आणीबाणीच्या काळात पोलीस, आरोग्य व सफाई कामगारांनप्रमाणे वीज कामगारांचे ही कौतुक करणे गरजेचे* *अत्यावश्यक सेवा देवूनही वीज कर्मचारी कौतुकापासून वंचित.

वीजपुरवठा ही अत्यावश्यक सेवेपैकी एक सेवा आहे.सर्वात महत्त्वाची अत्यावश्यक सेवा जीव धोक्यात घालुन देत असलेले वीज कामगार संकट काळी काळवेळ न पाहता सदैव सेवा देत असतात. मात्र आज वीज कामगारांच्या कामाची दखल घेण्यास कुणीही तयार नाही. कौतुका पासुन वंचित राहिलेल्या वीज कामगारांचे कौतुक करणे गरजेचे आहे. आजच्या या अभुतपुर्व जनता कर्फ्यूमध्ये आणि संचारबंदी काळामध्ये माञ तो दुर्लक्षित राहिला आहे, त्यांच्या कामाची ना शाषण ना जनता दखल घेतेय.

कोरोना आणीबाणीच्या काळात पोलीस, आरोग्य व सफाई कामगारांनप्रमाणे वीज कामगारांचे ही कौतुक करणे गरजेचे*  *अत्यावश्यक सेवा देवूनही वीज कर्मचारी कौतुकापासून वंचित.

मल्हारपेठ प्रतिनिधी 
विकास कदम

*कोरोना आणीबाणीच्या काळात पोलीस, आरोग्य व सफाई कामगारांनप्रमाणे वीज कामगारांचे ही कौतुक करणे गरजेचे*

*अत्यावश्यक सेवा देवूनही वीज कर्मचारी कौतुकापासून वंचित*

वीजपुरवठा ही अत्यावश्यक सेवेपैकी एक सेवा आहे.सर्वात महत्त्वाची अत्यावश्यक सेवा जीव धोक्यात घालुन देत असलेले वीज कामगार संकट काळी काळवेळ न पाहता सदैव सेवा देत असतात. मात्र आज वीज कामगारांच्या कामाची दखल घेण्यास कुणीही तयार नाही. कौतुका पासुन वंचित राहिलेल्या वीज कामगारांचे कौतुक करणे गरजेचे आहे. आजच्या या अभुतपुर्व जनता कर्फ्यूमध्ये आणि संचारबंदी काळामध्ये माञ तो दुर्लक्षित राहिला आहे, त्यांच्या कामाची ना शाषण ना जनता दखल घेतेय.

अत्यावश्यक सेवेपैकी एक असलेल्या महावितरनचा लाईन स्टाप कर्मचाऱ्यांची दखल घेत नसल्यामुळे याला प्रोत्साहन देण्यासाठी आरोग्य पोलिस खात्याबरोबरच याचांही कामाचे कौतुक होणे गरजेचे आहे. जगभरात सगळीकडे पोलीस, आरोग्य, सफाई कामगार, टाळ्या, थाळी वाजवणारे राजकारणी सेलीब्रेटी यांची दखल घेतली पण जीवाची पर्वा नकरता काम करणाऱ्या वीज कामगारांची सुध्दा दखल आपण घेणे गरजेचे होते. ती आजपर्यंत घेतली गेली नाही. इतरांन बरोबरच वीज कामगार या संकट काळात महत्त्वाचा आहे. जर का त्यांनी विद्युत पुरवठा अखंडीत ठेवला नसता तर त्यांची गरज आपणास कळाली असती. पण निमुटपणे जीव धोक्यात घालुन तो सेवा करीत आहे.

--------

वीज सप्लाय जर सुरळीत ठेवला नसता तर संचार बंदी काळात घरात थांबलेली मंडळी रस्त्यावर आली आसती ती कुणालाही ऐकली नसती. टीव्ही, फॅन, ऐसी, फ्रिज या शिवाय आपण घरात राहु शकत नाही. तसेच विहीर,नदी, बोअरींग वरील मोटर साठी पण भर उन्हात पोलवर चढुन जनतेला अखंडीत विज पुरवठा आम्ही करत असून आम्हा विज कर्मचारी यांच्या कामाची कुणीही दखल घेत नाही. आम्ही करत असलेलो काम देशहिताचे नाही का?

विलास आगाशे
लाईन स्टाप वीज कर्मचारी पाटण