कराडकरांसाठी आनंदवार्ता,१५ जण कोरोना मुक्त कृष्णा मधून ११ तर कॉटेज मधून ४ जण घरी

कराडकरांसाठी आनंदवार्ता,१५ जण कोरोना मुक्त कृष्णा मधून ११ तर कॉटेज मधून ४ जण घरी

 

*आज जिल्ह्यात पंधरा कोरोना मुक्त, जिल्ह्यासाठी दिलासादायक घटना* 

सातारा दि. 11 ( जि. मा. का ): आज सातारा जिल्ह्यातील 15 कोरोना बाधित रुग्ण कोरोना मुक्त झाले. जिल्ह्यासाठी दिलासादायक घटना आहे. यामध्ये कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथील 11 व वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 4 असे एकूण 15 रुग्णांची   14 व 15 दिवसा नंतर पुन्हा चाचणी करण्यात आली. या चाचणीमध्ये हे 15 कारोना बाधीत रुग्ण निगेटिव्ह आले आहेत. या 15 जणांना आज घरी सोडण्यात आले.
कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथील 11 जणांना कराड चॅरिटेबलचे अध्यक्ष डॉ. सुरेश  भोसले, या कॉलेज आणि हॉस्पिटलचे डीन डॉ.ए.वाय. क्षीरसागर  यांनी पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. यावेळी डॉक्टर्स, परिचारिका व कर्मचारी उपस्थित होते.
आत्तापर्यंत क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथून 8 व कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथून 23 व वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 4 असे जिल्ह्यातील  एकूण 35 रुग्ण कारोना मुक्त  झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
00000

★★★★★★★★★★★★★★★★★★★★

कराडकरांसाठी आनंदवार्ता,१५ जण कोरोना मुक्त कृष्णा मधून ११ तर कॉटेज मधून ४ जण घरी

कोरोनाला हरविणाऱ्या 11 जणांच्या 'टीम'ला कृष्णा हॉस्पिटलमधून डिस्चार्ज,तर कॉटेज मधून 4 जण घरी

आगाशिवनगर येथील 25 वर्षीय युवक, 27 वर्षीय युवक व 65 वर्षीय वृद्ध गृहस्थ

वनवासमाची येथील 32 वर्षीय महिला, 38 वर्षीय युवक व 13 वर्षीय मुलगा

मलकापूर येथील 54 वर्षीय पुरुष

कापील येथील 11 वर्षीय मुलगा, 49 वर्षीय गृहस्थ

कामेरी येथील 48 वर्षीय पुरुष, मिरेवाडी-फलटण येथील 28 वर्षीय युवक

कराड कॉटेज मधून 4 कोरोनामुक्त 5 वाजता सोडले घरी