कराड तालुक्यात कंटेनमेंट झोनमध्ये जिल्हाधिकार्‍यांनी जारी केले कडक मनाई आदेश

कराड मलकापूर उद्यापासून होणार पुर्ण "लॉकडाऊन" आज मध्यरात्रीनंतर कराड आणि मलकापुरसह परिसरातील 11 गावांमध्ये संपुर्ण लॉकडाऊन होणार आहे....

कराड तालुक्यात कंटेनमेंट झोनमध्ये जिल्हाधिकार्‍यांनी जारी केले कडक मनाई आदेश
सातारा/प्रतिनिधीः-
कोरोना प्रार्दुभाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांचे आदेशान्वये जिल्ह्यात क्रिमीनल कोडचे कलम 144 लागू करण्यात आले आहे.  सातारा जिल्हयात सध्यस्थितीत कोरोनाबाधित  रुग्णांपैकी 8 रुग्ण हे कराड तालुक्यातील असल्याने कराड शहर व नजीकचे नगरपरिषद व शहरानजीकच्या विविध ग्रामपंचायते क्षेत्र हे प्रतिबंधात्मक क्षेत्र करण्याकरीता उपविभागीय दंडाधिकारी तथा इन्सिडंट कमांडर कराड  यांनी प्रस्तावित केले आहे.
या प्रस्तावानुसार जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी कराड तालुक्यात जास्त प्रमाणात कोरोना विषाणूंचा संसर्ग झालेले रुग्ण आढळत असल्याने कराड तालुक्यातील संपुर्ण कराड नगरपालिका क्षेत्र, मलकापूर नगरपालिका क्षेत्र, जखीनवाडी, नांदलापूर, गोळेश्वर, कार्वे, कापील, सैदापूर, बनवडी, गोटे, वारुंजी, मुंढे, कोयना वसाहत या ग्रामपंचायतींचे क्षेत्र या कंटेनमेंट झोनमध्ये कोरोना विषाणूंचा वाढता प्रादुर्भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी  क्रिमिनल प्रोसिजर कोड 1973 चे कलम 144 मधील तरतूदीनुसार पुढीलप्रमाणे 23 एप्रिल रोजीच्या रात्री बारा वाजल्यापासून ते पुढील आदेशापर्यंत मनाई आदेश जारी केले आहेत.
याप्रमाणे सातारा जिल्हयातील कराड तालुक्यातील संपुर्ण कराड नगरपालिका क्षेत्र, मलकापूर नगरपालिका क्षेत्र, जखीनवाडी, नांदलापूर, गोळेश्वर, कार्वे, कापील, सैदापूर, बनवडी, गोटे, वारुंजी, मुंढे, कोयना वसाहत या ग्रामपंचायतीच्या क्षेत्रामध्ये कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी एका वेळेस 2 पेक्षा जास्त व्यक्तींना जमा होणेस सक्त मनाई करण्यात आली आहे. या प्रतिबंधित क्षेत्रात दवाखाने, हॉस्पीटल, नर्सिंग होम वगळून इतर सर्व प्रकारची दुकाने उघडण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. फक्त अत्यावश्यक सेवेतील औषधे घरपोच पुरविण्याबाबत उपविभागीय दंडाधिकारी तथा इन्सिडंट कमांडर कराड ज्याप्रमाणे यंत्रणा उभारतील, त्याप्रमाणे औषधे घरपोच पुरविण्यात येतील.  या प्रतिबंधीत क्षेत्रातील पोलीस विभागाचा पेट्रोलपंप वगळून इतर सर्व पेट्रोल पंप बंद राहतील. या पेट्रोलपंपावर अत्यावश्यक सेवेसाठी नियुक्त केले अधिकारी व कर्मचारी यांच्या वाहनांना इंधनपुरवठा करण्यात यावा. निकडीच्या प्रसंगी रुग्ण असल्याची खातरजमा करुनच रुग्णाची वाहतूक करणा-या वाहनांसाठीच मर्यादीत स्वरुपात इंधन पुरवठा करणेत यावा. या आदेशामधून अत्यावश्यक सेवेमध्ये कार्यरत असणारे शासकीय, निम शासकीय, खाजगी अधिकारी  कर्मचारी वगळणेत येत आहेत.  प्रतिबंधित क्षेत्रातील व्यक्तींची आरोग्य विषयक माहिती संकलित करणेकामी नियुक्त करणेत आलेल्या कर्मचार्‍यांना चूकीची माहिती देणे हा गंभीर स्वरुपाचा गुन्हा असून अशी चूकीची माहिती देणा-या विरुध्द कठोर कारवाई करणेची तरतूद आहे. त्यामुळे विचारलेली माहिती न लपविता पूर्णपणे तसेच अचूकरित्या नागरिकांनी द्यावी. व नियुक्त केलेल्या सर्व अधिकारी-कर्मचार्‍यांशी सौजन्याने वागावे. यापुर्वी वेगवेगळया विभागामार्फत देण्यात आलेले सर्व पास रदद करण्यात आले आहेत.  यापूर्वी नियुक्त केले अधिकारी, कर्मचारी यांचेपैकी अत्यावश्यक असलेले अधिकारी- कर्मचारी यांनाच उपविभागीय दंडाधिकारी तथा इन्सीडंट कमांडंर कराड यांनी स्वतंत्र नव्याने ओळखपत्र तसेच वाहन परवाना वितरीत करावा. वितरीत करण्यात येणार्‍या ओळखपत्र तसेच वाहन परवान्यावर क्रमांक,दिनांक, वेळ व कार्यक्षेत्र  यांचे वैधतेसह आवश्यक असणारा सर्व तपशिल नमूद करावा. पोलीस विभागाने त्यांचेशी निगडीत बाबींच्या अनुषंगाने काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, असे या आदेशात नमुद करण्यात आले आहे. 
 
सातारा जिल्हाधिकारी आदेश खालीलप्रमाणे
 
ज्याअधी, मा. मुख्य सचिव, महसूल व वनविभाग, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनवर्सन, महाराष्ट्र शासन यांचेकडील अधिसूचना क.टीएम/2020/सोआर.927ीआयएसएम-1 दि. 1304/2020 अन्वये संपूर्ण महाराष्ट्रातील लॉकडाऊन कालावधी दि. 30/04/2020 रोजीपर्यंत वाढविणेत आला आहे.आणि, ज्याअर्थी, याचा क्र.7 मधील आदेशान्वये सातारा जिल्हयात दि 21/04/2020 रोजीचे 18.00 वाजले पासून ते पुढील आदेश होईपर्यंत शिमिनल प्रोसिजर कोड 1973 चे कलम 144 लागू करणेत आले आहे. आणि ज्याअर्थी, उपविभागीय दंडाधिकारी तथा इन्सिडंट कमांडर कराड, उपविभाग कराड यांनी वरील बाचा क्र. 8 अन्वये सातारा जिल्हयातील सध्यस्थितीत 17 कोरोना बाधित रुग्ण असून त्यापेकी 8 कोरोना बाधित रुगण कराड तालुक्यातील असून कराड तालुक्यातील कराड शहर व नजीकचे नगरपरिषद व शहरानजीकच्या ग्रामपंचायतीच्या क्षेत्रामध्ये
सदर रुग्ण आढळून आले असलेने कराड तालुक्यातील संपुर्ण कराड नगरपालिका क्षेत्र, मलकापूर नगरपालिका क्षेत्र,जखीनवाडी ग्रामपंचायत क्षेत्र, नांदलापूर ग्रामपंचायत क्षेत्र, गोळेश्वर प्रामपंचायत क्षेत्र, कार्य प्रामपंचायत क्षेत्र, कापील ग्रामपंचायत क्षेत्र, सेदापूर ग्रामपंचायत क्षेत्र, बनवडी ग्रामपंचायत क्षेत्र, गोटे प्रामपंचायत क्षेत्र, बारुनी प्रामपंचायत क्षेत्र, मुंडे ग्रामपंचायत क्षेत्र, कोयना वसाहत प्रामपंचायत क्षेत्र प्रतिबंधात्मक क्षेत्र करण्याकरीता प्रस्तावित केले आहे.आणि ज्यामी, सातारा जिल्लयातील कराड तालुक्यात जासा प्रमाणात कोरोना विषाणूचा संसर्ग झालेले रुग्ण आवळत असलेने संपुर्ण कराड नगरपालिका क्षेत्र, मलकापूर नगरपालिका क्षेत्र, गखीनवाडी ग्रामपंचायत क्षेत्र, नांदलापूर ग्रामपंचायत क्षेत्र, गोळेश्वर प्रामपंचायत क्षेत्र, कार्वे ग्रामपंचायत क्षेत्र, कापील ग्रामपंचायत क्षेत्र, सेापूर ग्रामपंचायत क्षेत्र, बनवडी ग्रामपंचायत क्षेत्र, गोटे ग्रामपंचायत क्षेत्र, वारुंजी ग्रामपंचायत क्षेत्र, मुंळे ग्रामपंचायत क्षेत्र, कोयना वसाहत ग्रामपंचायत क्षेत्र या कंटेनमेंट झोनमध्ये कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव नियंत्रणात ठेवणेचे अनुषंगाने सातारा जिलयातील कराड तालुक्यामधील वर नमूद केले क्षेत्रामध्ये क्रिमिनल प्रोसिजर कोड 1973 चे कलम 144 मधील तरतूदीप्रमाणे खालील नमूद केलेया बीना मनाई करणे आवस्यक असलेचे माझे मत झाले आहे. त्याअर्थी, मी शेखर सिंह, जिल्हादंडाधिकारी, सातारा क्रिमिनल प्रोसिजर कोड 1973 चे कलम 144 मधील
तरतूदीनुसार मला प्राप्त असलेल्या अधिकारान्वये दि. 23/04/2020 रोजीचे 00.00 वाजले पासून ते पुढील आदेश होईपर्यंत खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे..
 
1. सातारा जिल्हयातील कराड तालुक्यातील संपुर्ण कराड नगरपालिका क्षेत्र, मलकापूर नगरपालिका क्षेत्र,
जखीनबाडी ग्रामपंचायत क्षेत्र, नांदलापूर ग्रामपंचायत क्षेत्र, गोळेश्वर ग्रामपंचायत क्षेत्र, कार्ये ग्रामपंचायत क्षेत्र,
कापील ग्रामपंचायत क्षेत्र, सैदापूर ग्रामपंचायत क्षेत्र, बनवडी ग्रामपंचायत क्षेत्र, गोटे ग्रामपंचायत क्षेत्र, वारुंजी
ग्रामपंचायत क्षेत्र, मुंढे ग्रामपंचायत क्षेत्र व कोयना वसाहत प्रामपंचायत क्षेत्रामध्ये कोणत्याही सार्वजनिक
ठिकाणी एका वेळेस 2 पेक्षा जास्त व्यक्तींना जमा होणेस सक्त मनाई करणेत येत आहे.
 
2. सदर प्रतिबंधीत क्षेत्रात दवाखाने, हॉस्पीटल, नर्सिंग होम वगळून इतर सर्व प्रकारची दुकाने उपडणेस सक्त
मनाई करणेत येत आहे. सदर प्रतिबंधित क्षेत्रात फक्त अत्यावश्यक सेवेतील औषधे घरपोच पुरविणेबाबत
उपविभागीय दंडाधिकारी तथा इन्सिाइंट कमांडर कराड, उपविभाग कराड ज्याप्रमाणे यंत्रणा उभारतील,
त्याप्रमाणे औषधे घरपोच पुरविणेत येतील.
 
3. सदर प्रतिबंधीत क्षेत्रातील पोलीस विभागाचा पेट्रोलपंप वगळून इतर सर्व पेट्रोल पंप बंद राहतील. सदर पेट्रोल
पंपावर अत्यावश्यक सेवेसाठी नियुक्त केले अधिकारी/ कर्मचारी यांचे वाहनांना इंधनपुरवठा करणेत यावा.
तसेच निकडीचे प्रसंगी रुग्ण असलेषी खातरजमा करूनच रुग्णाची वाहतूक करणा-या वाहनांसाठीच मर्यादीत
स्वरुपात इंधन पुरवठा करणेत यावा,
 
4. सदर आदेशामधून अत्यावश्यक सेवेमध्ये कार्यरत असणारे शासकीय, निम शासकीय, खाजगी अधिकारी/
कर्मचारी वगळणेत येत आहेत.
 
5. सदर प्रतिबंधित क्षेत्रातील व्यक्तींची आरोग्य विषयक माहिती संकलित करणेकामी नियुक्त करणेत आलेल्या
कर्मचान्यांना चूकीची माहिती देणे हा गंभीर स्वरुपाचा गुन्हा असून अशी चूकीची माहिती देणा-या विरुध्द कठोर
कारवाई करणेची तरतूद आहे. त्यामुळे विचारलेली माहिती न लपविता पूर्णपणे तसेच अधूकरित्या देणेत यावी.
तसेच अत्यावश्यक सेवेकामी नियुक्त केलेले सर्व अधिकारी / कर्मचारी यांचेशी सोजन्याने वागावे,
 
6. यापूर्वी वेगवेगळ्या विभागामार्फत देणेत आलेले सर्व पास रदद करणेत येत आहेत. यापुर्वी नियुक्त केले
अधिकारी, कर्मचारी यांचेपेकी आत्यावश्यक असलेले अधिकारी / कर्मचारी यांनाच उपविभागीय दंडाधिकारी
कराड तथा Inciedent Commander कराड यांनी स्वतंत्र नव्याने ओळखपत्र तसेच वाहन परवाना वितरीत
करणेत पाया. वितरीत करणेत येणान्या ओळखपत्र तसेच वाहन परवान्यावर क्रमांक दिनांक, वेळ व कार्यक्षेत्र
यांचे वेधतेसह आवश्यक असणारा सर्व तपशिल नमूद करणेत यावा.
 
7. पोलीस विभागाने त्यांचेशी निगडीत बाबींच्या अनुषंगाने काटेकोरपणे अंमलबजावणी करावी.
उपरोक्त आदेशाची पालन न करणा-यांविरुध्द आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 तसेच
भा.दं.वि, 1860 चे कलम 188 नुसार गुन्हे दाखल करणेची कार्यवाही संबंधित पोलीस अधिकारी कर्मचारी यांनी करावी.
 
सदरचा आदेश दि. 22/04/2020 रोजी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या सहीने आदेशात करण्यात आले आहेत.