कराड तालुक्यातील म्हासोली येथील आठ बाधित कोरोनामुक्त; आज सोडले घरी

कराड तालुक्यातील म्हासोली येथील आठ बाधित कोरोनामुक्त; आज सोडले घरी

सातारा दि. 28 :   

 

कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे दाखल असणाऱ्या कराड तालुक्यातील म्हासोली येथील 8 कोरोना बाधित रुग्ण पूर्णपणे बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

  म्हासोली ता. कराड येथील 16, 17 व 18 वर्षीय युवक, 45, 50 व 62 वर्षीय पुरुष तसेच 35 व 48 वर्षीय महिला यांचा समावेश आहे. या आठ रुग्णांची   14 व 15 दिवसा नंतर पुन्हा चाचणी करण्यात आली. या चाचणीमध्ये हे  बाधीत रुग्ण निगेटिव्ह आले आहेत. या आठ  जणांना आज घरी  सोडण्यात आले.  

आत्तापर्यंत जिल्ह्यात 134  जण पूर्णपणे बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे