कराड फलटण कोरोनाच्या निशाण्यावर,कराडला पाच तर फलटणला एक जण पॉझिटिव्ह रुग्ण

सातारा जिल्ह्यातील कोरोनाचा विळखा वाढला आणखी सहा रूग्णांचे रिपोट आले पाॕझिटीव्ह आले असून यामधील कराड कृष्णा रूग्णालयात 5 रुग्णांना केले होते दाखल तर 1 जण फलटण येथील आहे

कराड फलटण कोरोनाच्या निशाण्यावर,कराडला पाच तर फलटणला एक जण पॉझिटिव्ह रुग्ण

कराड फलटण कोरोनाच्या निशाण्यावर,कराडला पाच तर फलटणला एक जण पॉझिटिव्ह

सातारा जिल्ह्यातील कोरोनाचा विळखा वाढला
आणखी सहा  रूग्णांचे रिपोट आले पाॕझिटीव्ह आले असून यामधील कराड कृष्णा रूग्णालयात 5 रुग्णांना केले होते दाखल तर 1 जण फलटण येथील आहे

सातारा जिल्ह्यात आता कोरोनाचा आकडा 41 वर अत्यंत आवश्यक कामाशिवाय घरातून बाहेर पडू नका

टोटल *41* सातारा जिल्हा

सातारा जिल्हयात आणखी सहा जणांना कोरोनाची लागण.... 

*कराड येथे कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या सहा जणांचे रिपोर्ट आले पाॅझीटीव्ह*

*सातारा जिल्हयात कोरोना बाधित रुग्णांची संख्या झाली 41*

कराड मध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या झाली 30

सातारा जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. अमोद गडीकर यांची माहिती

 

पुणे येथून प्रवास करुन आलेला 28 वर्षीय युवक पॉझिटिव्ह ,  58 अनुमानितांचे रिपोर्ट निगेटिव्ह तर 86 जणांना केले दाखल
 
सातारा दि. 28( जि. मा. का ) : पुणे येथून प्रवास करुन आलेल्या 28 वर्षीय युवकाला दि 25 एप्रिल  रोजी उपजिल्हा रुग्णालय, फलटण येथे दाखल करण्यात आले होते. हा युवक पॉझिटिव्ह (कोविड-19)   बाधित असल्याचे बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांनी कळविले आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.
या रुग्णावर पुढील उपचार   क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे करण्यात येणार आहे. 
आता सातारा जिल्ह्यात 36  रुग्ण कोविड बाधित असून आता पर्यंत 5 (कोविड 19) मुक्त होऊन रुग्णालयातून सोडले आहेत तर 2 जणांचा मृत्यू झाला आहे.
  तसेच क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 6, कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथील 6, उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 44, फलटण येथील 2 असे एकूण 58 अनुमानितांचे रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचे बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांनी कळविले आहे. तसेच 27 एप्रिल रोजी रात्री उशिरा क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा 21, उपजिल्हा रुग्णालय, कराड येथे 57, ग्रामीण रुग्णालय, कोरेगाव येथे 8 असे एकूण 86 जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले असून या सर्वांच्या या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहितीही डॉ. गडीकर यांनी दिली आहे.
---------------------------------------------------------------------

वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुगणालय, कराड येथे दाखल असणाऱ्या पाच नागरिकांचा अहवाल पॉझिटिव्ह, 
22 अनुमानितांचे रिपोर्ट निगेटिव्ह तर 167 जणांना केले दाखल

सातारा दि. 28( जि. मा. का ) : वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथे उपचार सुरु असलेले  बाधित रुग्ण क्रमांक 17 चे  निकट सहवासित 3 आणि बाधित रुग्ण क्रमांक 29 चे निकट सहवासित 2  अशा एकूण   5 नागरिकांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून तें  (कोविड-19)   बाधित असल्याचे बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांनी कळविले आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.
           तसेच कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथील 8 व ग्रामीण रुग्णालय, कोरेगाव येथील 14 असे एकूण 22 अनुमानितांचे रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचे बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांनी कळविले आहे. आज 28 एप्रिल रोजी क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे 5, कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे 73, उपजिल्हा रुग्णालय, कराड येथे 80, ग्रामीण रुग्णालय कोरेगाव येथे 9 असे एकूण 167 जणांना अनुमानित म्हणून विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे.   या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहितीही डॉ. गडीकर यांनी दिली आहे.
      आता जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या 41 झाली आहे.  त्यातील दोघांचा मृत्यू, 5 कोरोना मुक्त होऊन घरी गेले. उर्वरित रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
00000