एका अनुमानिताचा रिपोर्ट निगेटिव्ह जिल्ह्यात 41 अनुमानित दाखल; यातील 5 महिन्याच्या बाळाचा मृत्यु

क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे दाखल असणाऱ्या एका अनुमानित रुग्णाचा रिपोर्ट निगेटिव्ह आला असल्याचे बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांनी कळविले आहे.

एका अनुमानिताचा रिपोर्ट निगेटिव्ह  जिल्ह्यात 41 अनुमानित दाखल; यातील 5 महिन्याच्या बाळाचा मृत्यु

सातारा दि.22 (जि.माका) : क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा  येथे दाखल असणाऱ्या एका अनुमानित रुग्णाचा रिपोर्ट निगेटिव्ह आला असल्याचे बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांनी कळविले आहे.

तसेच क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा  येथे श्वसन संस्थेच्या तीव्र जंतु संसर्गामुळे 1, बाहेर जिल्ह्यातून प्रवास करुन आलेले 2 व सध्या दाखल असलेल्या बाधित रुग्णाचे निकट सहवासित 9 तर कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथे श्वसन संस्थेच्या तीव्र जंतु संसर्गामुळे 4, सध्या दाखल असलेल्या बाधित रुग्णाचे निकट सहवासित 24 व उपजिल्हा जिल्हा रुग्णालय, कराड येथील बाधित रुग्णाचा निकट सहवासित 1 अशा एकूण 41 जणांना अनुमानित म्हणून आज विलगीकरण  कक्षात दाखल करण्यात आले आहे.  या 41  अनुमानितांच्या घशातील स्त्रावांचे नमुने बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, कृष्णा मेडिकेल कॉलेज, कराड येथील अनुमानित रुग्णांमध्ये  5 महिन्याच्या पुरुष जातीच्या बाळाचा समावेश असून त्याचा मृत्यु झाला आहे,  अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.