2 रुग्णांचा अहवाल कोरोना बाधित; 67 जणांचे अहवाल आले निगेटिव्ह तर 142 जणांना केले विलगीकरण कक्षात दाखल

2 रुग्णांचा अहवाल कोरोना बाधित; 67 जणांचे अहवाल आले निगेटिव्ह तर 142 जणांना केले विलगीकरण कक्षात दाखल

2 रुग्णांचा अहवाल कोरोना बाधित;
67 जणांचे अहवाल आले निगेटिव्ह तर 142 जणांना केले विलगीकरण कक्षात दाखल 

सातारा दि. 12  : क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय येथे ठाणे येथून प्रवास करुन आलेला एक 20 वर्षीय युवक व कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे निगट सहवासित म्हणून दाखल असणारा 29 वषीय पुरुष असे एकूण 2 जणांचे अहवाल कोरोना बाधित (कोविड-19 ) आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.
67 जणांचे अहवाल आले निगेटिव्ह 
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 26, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय येथील 5, कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथील 19  व ग्रामीण रुग्णालय, कोरेगाव येथील 17 असे एकूण 67 जणांचा अहवाल निगेटिव्ह आले असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गडीकर यांनी कळविले आहे.
142 जणांना केले विलगीकरण कक्षात दाखल 
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे 9 व वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथे 133  असे एकूण 142 जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक  डॉ. गडीकर यांनी दिली.

  जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्या व्यक्तिंची संख्या- 121 झाली असून या पैकी उपचार घेत असलेले बाधीत रुग्ण (कोविड-19)- 84, कोरोना मुक्त होवून घरी गेले रुग्ण- 35, कोरोना बाधित मृत्यु झालेले 2  रुग्ण आहेत.