कृष्णा हॉस्पिटल मधील चार  जणांचा अहवाल आला पॉझिटिव्ह, इंदोली,भारेवाडी,म्हासोली येथील रुग्ण

कृष्णा हॉस्पिटल मधील चार  जणांचा अहवाल आला पॉझिटिव्ह, इंदोली,भारेवाडी,म्हासोली येथील रुग्ण

सातारा दि. 20 (जिमाका) :  कृष्णा मेडिकल कॉलेज येथे दाखल असलेले
म्हासोली ता. कराड येथील 40 वर्षीय निकट सहवासित पुरुष, मुंबई येथून प्रवास
करुन आलेला  इंदोली ता. कराड येथील एक 39 वर्षीय पुरुष व ठाणे येथून प्रवास
करुन आलेले भारेवाडी ता. पाटण येथील पती - पत्नी वय वर्षे 52 व 43 अशा एकूण 4
जणांचा अहवाल कोरोनाबाधित आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर
यांनी दिली.

      जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्या व्यक्तिंची संख्या- 170 झाली
असून या पैकी उपचार घेत असलेले कोरोनाबाधित रुग्णसंख्या 69 इतकी असून कोरोना
मुक्त होवून घरी गेलेले रुग्णसंख्या 98 आहे तर मृत्यु झालेले 3 रुग्ण आहेत.