कोळकी येथील मृत व्यक्तीच्या घरातील ४ व्यक्तींना कोरोनाची लागण

कोळकी येथील मृत व्यक्तीच्या घरातील ४ व्यक्तींना कोरोनाची लागण

फलटण /प्रतिनिधी

फलटण तालुक्यातील कोळकी या ठिकाणी सोमवार दिनांक १८ मे रोजी रोजी कुर्ला,मुंबई येथून कुटुंबासह कोळकी येथे आलेल्या ७४ वर्षीय व्यक्तीचा त्याच दिवशी मृत्यू झाला होता.मात्र त्याचा कोरोना अहवाल हा कोरोना पाॅझिटिव्ह आला असल्याची माहिती डॉ.अमोद गडीकर यांनी दिली होती.
       यामुळे फलटणशहरासह तालुक्यात कोळकी व अक्षतनगर परिसरात खळबळ उडाली होती.व संपूर्ण तालुक्यात भितीचे वातावरण निर्माण झाले होते.
      याबाबत सविस्तर माहिती अशी की सोमवार दिनांक १८ मे रोजी कुर्ला,मुंबईवरून फलटण शहरा लगत असणा-या कोळकी या ठिकाणी हा व्यक्ती त्याच्या कुटुंबासह फलटण  कोळकी येथे आला होता सकाळी तो व्यक्ती आला होता.सदरच्या व्यक्तीला हृदय विकराचा त्रास होता.त्याचा हृदय विकाराच्या झटक्याने सोमवारीच मृत्यू झाला होता.
           मात्र कुर्ला मुंबई वरून फलटण कोळकी या ठिकाणी आलेल्या व्यक्तीचे खबरदारी म्हणून त्याच्या मृत्यूनंतरही त्या व्यक्तीचा स्वॅब घेण्यात आला होता.बुधवार दिनांक २१ मे रोजी सदर व्यक्तीचा कोविड - १९ अहवाल पाॅझिटीव्ह आला आहे.अशी माहिती उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप यांनी दिली होती.
   कोविड - १९ अहवाल पाॅझिटीव्ह आला आहे.अशी माहिती उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप यांनी दिली होती .
           त्यानंतर लगेच उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप, तसेच आदी अधिका-यांची कोळकी या ठिकाणी जाऊन त्याच्या संपर्कात आलेल्या लोकांना ताब्यात घेण्यात आले होते.
                 त्यानंतर खबरदारी म्हणून महसूल प्रशासनाच्या वतीने कोळकी ग्रामपंचायत हद्दीत असणा-या अक्षतनगरचा भाग  ब्रम्हा हाॅटेल ते आरोग्य उपकेंद्रपर्यंतचा भाग हा मायक्रो कंटेन्मेंट म्हणून जाहीर करण्यात आले आहे.
         मृत व्यक्तीच्या घरातील लोकांचे स्वाब घेण्यात आले होते.मृत्यूनंतर पाॅसिटीव्ह आलेल्या ७४ वर्षीय मयत व्यक्तीच्या कुटुंबातील इतर ४ व्यक्तींचे अहवालही पाॅझिटिव्ह आले आहेत. त्यामध्ये मयत व्यक्तींची पत्नी, सून व दोन नातू यांचा समावेश आहे.
तर  कोळकी येथील इतर High Risk व्यक्तींचा स्वॅब संपर्काच्या ८ व्या दिवशी घेण्यात येणार आहे.
       कोरोना केअर सेंटरमधील एका हेल्थकेअर व्यक्तीचा घेण्यात आलेला स्वॅब  निगेटीव्ह  आला आहे.अशी माहिती उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप यांनी दिली आहे.