रात्री आलेल्या रिपोर्टनुसार 27 कोरोना बाधित...एकूण रुग्ण संख्या 336

रात्री आलेल्या रिपोर्टनुसार 27 कोरोना बाधित...एकूण रुग्ण संख्या 336

 

सातारा जिल्ह्यात 27 कोरोना बाधित; जांभळी येथे मृत्यू झालेल्या 52 वर्षीय पुरुषाचाही त्यात समावेश

सातारा दि. 25 :-

  सातारा जिल्यातील विविध कोरोना केअर सेंटर आणि रुग्णालयातील अनुमानितांचे रिपोर्ट आले असून 27 जण कोरोना ( कोविड 19 ) बाधित असून यात मुंबई येथून आलेल्या वाई तालुक्यातील जांभळी येथील मृत्यू झालेल्या 52 वर्षीय पुरुषाचाही समावेश आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
कोरोना बाधित रुग्णांमध्ये समावेश असलेल्या रुगणांची तालुका निहाय व गाव निहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे, महाबळेश्वर तालुक्यातील पाचगणी येथील 2, जावळी तालुक्यातील सायगाव येथील 1, मोरघर येथील 4, सावरी (ग्रामपंचायत कसबे बामणोली) येथील 1, वाई तालुक्यातील परतवाडी येथील 3, दह्याट येथील 4, अकोशी येथील 1, धावडी येथील 2, जांभळी येथील 1 (मृत्यू),  खंडाळा तालुक्यातील आंधोरी येथील 1,  सातारा तालुक्यातील रायघर येथील 1, शेळकेवाडी येथील 2,  खटाव तालुक्यातील डांभेवाडी येथील 1, कराड तालुक्यातील म्हासोली येथील 1, आणि पाटण तालुक्यातील खळे येथील 1 व काळेवाडी(आडूळ)येथील 1 अशा 27 कोरोना बाधित रुग्णांचा समावेश आहे.