5 नागरिकांचा अहवाल आला पॉझिटिव्ह; 5 जणांचा मृत्यु पश्चात अहवाल निगेटिव्ह तर 1 मृत महिलेचा नमुना तपासणीकरिता पाठविला 237 जणांचे अहवाल आले निगेटिव्ह; 14 जणांना केले विलगीकरण कक्षात दाखल

5 नागरिकांचा अहवाल आला पॉझिटिव्ह; 5 जणांचा मृत्यु पश्चात अहवाल निगेटिव्ह तर 1 मृत महिलेचा नमुना तपासणीकरिता पाठविला 237 जणांचे अहवाल आले निगेटिव्ह; 14 जणांना केले विलगीकरण कक्षात दाखल

 

5 नागरिकांचा अहवाल आला पॉझिटिव्ह; 5 जणांचा मृत्यु पश्चात अहवाल निगेटिव्ह तर 1 मृत महिलेचा नमुना तपासणीकरिता पाठविला
237 जणांचे अहवाल आले निगेटिव्ह; 14 जणांना केले विलगीकरण कक्षात दाखल

सातारा दि. 1 (जिमाका) : रात्री उशिरा आलेल्या रिपोर्टनुसार पाटण तालुक्यातील नवरेवाडी येथील 1 (60 वर्षीय पुरुष), वाई तालुक्यातील वोव्हाळी येथील 1 (42 वर्षीय पुरुष) व जांभळी येथील 1 (11 वर्षीय मुलगी), महाबळेश्वर तालुक्यातील कोट्रोशी येथील 1 (10 वर्षीय मुलगी) व हरचंदी येथील 1 (63 वर्षीय पुरुष) असे एकूण 5 रुग्णांचा रिपोर्ट कोविड बाधित आल्याची माहिती  जिल्हा शल्यचिक्सिक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.
महाबळेश्वर तालुक्यातील झांजवड येथील 57 वर्षीय पुरुष, पाथरवाडी ता. कराड येथील 33 वर्षीय पुरुष व बुधवार पेठ, सातारा येथील 65 वर्षीय महिला, अंबेदरे आसरे ता. वाई येथील 43 वर्षीय महिला तसेच  उंब्रज ता. कराड येथील 60 वर्षीय पुरुषाचा
असे एकूण 5 जणांचा मृत्यु पश्चात घेतलेल्या नमुन्याचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. 
क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे काल रात्री उशिरा रांजणी ता. जावली येथून घेऊन आलेल्या 85 वर्षीय मृत महिलेचा मृत्यु पश्चात नमुना तपासणीकरिता पुणे येथे  पाठविण्यात आला असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिक्सिक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.
237 जणांचे अहवाल आले निगेटिव्ह
रात्री उशिरा एन.सी.सी.एस. पुणे यांनी 228 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचे कळविले आहे व कृष्णा मेडीकल कॉलेज, कराड यांनी 9 जणांचे रिपोर्ट असे एकूण 237 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचे जिल्हा शल्यचिक्सिक डॉ. आमोद गडीकर कळविले आहे.
14 जणांना केले विलगीकरण कक्षात दाखल
क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे 14 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने एन.सी.सी.एस. पुणे  यांच्याकडे तपासणीकरिता पाठविण्यात आले असल्याची  माहिती जिल्हा शल्यचिक्सिक डॉ. आमोद गडीकर कळविले आहे.
आत्तापर्यंत जिल्ह्यात 521 कोरोना बाधित रुग्ण आढळले असून त्यापैकी 160 रुग्ण बरे झाले आहेत.  तर 340 रुग्णांवर उपचार सुरु असून 21  जणांचा मृत्यु झालेला आहे.