फलटण तालुक्यातील ५ लोकांचे रिपोर्ट आले कोरोना पॉझिटिव्ह

फलटण तालुक्यातील ५ लोकांचे रिपोर्ट आले कोरोना पॉझिटिव्ह

फलटण/प्रतिनिधी

 तालुक्यातील ५ लोकांचे रिपोर्ट आले कोरोना पॉझिटिव्ह - चेंबूर, मुंबई येथून कोळकी, ता.फलटण येथे रविवारी दिनांक २४ मे रोजी कुटुंबासह आलेल्या एक महिला (५०वर्षे) व एक पुरुष (२५ वर्षे) यांचा कोविड अहवाल पाॅझिटीव्ह आला आहे. (यापूर्वीच याच कुटुंबातील एका पुरुषाचा अहवाल पाॅसिटीव्ह आला होता)(High Risk Contacts)
तर मुंबई परिसरातून मौजे जोर ( वाखरी) येथे आलेल्या एका १२ वर्षीय मुलाची कोविड चाचणी पाॅझिटीव्ह आली आहे. तसेच High Risk Contact मधील शेजारील घरातील (कोपरखैरणे वरुन आलेले) एक मुलगी(२५ वर्षे) व एक मुलगा (२१ वर्षे) पाॅसिटीव्ह आले आहेत.

मंगळवार दिनांक ०२ जून रोजी घेतलेल्या ३० पैकी २३ निगेटीव्ह आले असून २ Inconclusive आहेत व उपरोक्तप्रमाणे ५ पाॅझिटीव्ह आहेत.अशी माहिती उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप यांनी दिली आहे.