६० वर्षीय कोरोनाबाधित महिलेच्या मृत्यूमुळे वाई शहरात खळबळ

६० वर्षीय कोरोनाबाधित महिलेच्या मृत्यूमुळे वाई शहरात खळबळ

वाई/दौलतराव पिसाळ 

वाई शहरातील ब्राह्मणशाही येथील कोरोनो पॉझिटीव्ह  असलेल्या ६० वर्षीय महिलेचा सातारा येथील शासकीय रुग्णालयात उपचारा दरम्यान दि, 3 रोजी रात्री मृत्यू झाल्याने वाई शहरात खळबळ ऊडाली आहे त्यामुळे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे .

सविस्तर वृत्त असे कि वाई शहरातील ब्राह्मणशाही येथील रहिवासी असलेल्या या ६० वर्षीय महिलेला अचानक त्रास होऊ लागल्याने तिचा दि, २८ रोजी स्वॉपचे नमुने घेऊन ते तपासणी साठी पाठविले होते त्याचा दि  २९ रोजी पॉझिटीव्ह रिपोर्ट आल्यामुळे त्यांना उपचारासाठी सातारा येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते त्यांचा  दि , 3 रोजी रात्री उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याने वाई शहरात खळबळ ऊडाली आहे.
 
त्यांच्या कुटुंबियांमधील ७२ वर्षीय पुरुष २७ वर्षीय महिला ४ वर्षीय मुलगा ८ वर्षाचा मुलगी ३४ वर्षीय महिला ६ वर्षीय मुलगी हे सर्व पॉझिटीव्ह आल्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत अशी माहिती वाई तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्या कडून प्राप्त झाली आहे