वाई मध्ये पोलिसांवर कोरोनाचा हल्ला

१२ पोलीस कोरोना पॉझिटीव्ह

वाई मध्ये पोलिसांवर कोरोनाचा हल्ला

वाई / दौलतराव पिसाळ

वाई पोलिस ठाण्यावर कोरोनो विषाणूचा  अति भयंकर हल्ला या झालेल्या हल्यात 12 पोलिस कर्मचारी पॉझिटीव्ह आल्यामुळे वाई शहरासह पोलिस दलात खळबळ उडाली आहे त्या मुळे पोलिस कर्मचार्यांन मध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे सविस्तर वृत्त असे कि दोन दिवसा पुर्वी वाई पोलिस ठाण्यातील ट्रॅफिक पोलीस हवलदार यांना अचानक पणे त्रास होऊ लागल्याने त्यांच्या घशातील स्वॉप नमुने तपासणी साठी पाठविले होते त्याचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्यामुळे त्यांना वाई येथील गीतांजली हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल केले आहे पण इतर पोलिस कर्मचारी तापाने आजारी होते 
त्यामुळे वाई पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक आनंदराव खोबरे यांनी याची गंभीर दखल घेऊन दि, 12 रोजी तातडीने १७ पोलिस कर्मचार्यांचे स्वॉपचे नमुने घेण्याचे आदेश आरोग्य विभागाला दिले होते ते नमुने तपासणी
साठी पाठविण्यात आले होते १७ पोलिस कर्मचार्यांन पैकी आज १२ पोलिस कर्मचार्यांचे  रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्यामुळे वाईच्या पोलिस ठाण्यात खळबळ उडाली आहे वाई पोलिसांनी वाई शहरा सह तालुक्यातील गावांन मध्ये कोरोनो सारख्या अदृष्य विषाणूचा 
फैलाव होऊ नये म्हणून गेल्या चार महिन्या पासून रस्त्यावर २४ तास प्रामाणिक पणे ड्युटी 
करुन प्रयत्नांची पराकाष्ठा करीत कोरोनो रोग रोखण्यासाठी  प्रयत्न केले होते त्यात वाई पोलिसांना मोठ्या प्रमाणात यशही आले होते 
परंतु मध्यंतरीच्या काला वधीत जिल्हा प्रशासनाने लॉक डाऊन शिथील केल्याने पुन्हा
वाई शहरात नागरीकांचा महापुराचा लोंढा आल्यामुळेच कोरोनो सारख्या रोगाचा फैलाव गतीमान झाला पोलिस  आमच्या साठी स्वताचा प्रपंच सोडुन रस्त्यावर ऊतरतात तरीही नागरिकांन मध्ये कसलीच सुधारणा झाली नाही 
हे दुर्दैव आहे पण वाई पोलिस ठाण्यातील ट्रॅफिक पोलीसा सह इतर १२ पोलिसांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत.