सोमवार ठरला फलटण तालुक्यासाठी घातवार: ४० जणांना कोरोनाची बाधा

फलटण तालुक्याची डब्बल सेंच्युरी कडे वाटचाल

सोमवार ठरला फलटण तालुक्यासाठी घातवार: ४० जणांना कोरोनाची बाधा

फलटण / अनमोल जगताप 

फलटण शहरासह तालुक्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. काल चक्क फलटण तालुक्यासह शहरात एकाच दिवशी तब्बल २३ रुग्ण आढळले. यामुळे संपूर्ण फलटण शहरात आणि फलटण तालुक्यातील खेडेगावांच्या मध्ये भितीचे वातावरण आहे. तर कित्येक गावे हादरून गेली आहेत. फलटण तालुक्‍यातील आज अखेर कोरोनाग्रस्ताची संख्या १९० वर पोहोचली आहे. 

याबाबत उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप यांनी सांगितले माहिती नुसार सोमवार दिनांक २० जुलै रोजी फलटण तालुक्यातील ४० जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे, रविवार दिनांक १२ जुलै रोजी विंचुर्णी येथील ४३ वर्षीय पुरूषाची चाचणी ही कोविड-१९ पॉझिटिव्ह आली होती, संबंधित पाॅझिटीव्ह आलेल्या व्यक्तीच्या निकट संपर्कातील १३, २० व २१ वर्षांची मुले, ४०, ४०, ४५ व ७० वर्षांच्या महिला आणि १०, १७, १९, १९, व २२ वर्षांच्या मुली (एकूण १२) यांची कोविड चाचणी पाॅसिटीव्ह आली आहे.
तर बुधवार दिनांक १५ जुलै रोजी गोळीबार मैदान, फलटण येथील पाॅझिटीव्ह आलेल्या व्यक्तीच्या निकट संपर्कातील ३८, ४३, ४६, ५५ व ५८ वर्षीय पुरुष (एकूण ५) यांची कोविड चाचणी पाॅझिटीव्ह आली आहे.

तसेच सोमवार पेठ, फलटण येथील पूर्वी पाॅझिटीव्ह आलेल्या व्यक्तीच्या निकट संपर्कातील ६० वर्षीय पुरुष यांची कोविड चाचणी पाॅझिटीव्ह आली आहे.तर फलटण तालुक्यातील मिरढे येथील ४५ वर्षीय पुरुषाची कोविड चाचणी पाॅझिटीव्ह आली आहे.त्याबरोबरच मलठण येथील २७ वर्षीय महिलेची व ७० वर्षीय पुरुषाची कोविड चाचणी पाॅझिटीव्ह आली आहे. तर सासवड येथील २५ वर्षीय महिलेची कोविड चाचणी पाॅझिटीव्ह आली आहे.तसेच रावडी खु येथील ३४ वर्षीय पुरुषाची कोविड चाचणी पाॅझिटीव्ह आली आहे.
तर  लक्ष्मीनगर फलटण येथील पूर्वी पाॅझिटीव्ह आलेल्या व्यक्तीच्या निकट संपर्कातील १९ वर्षांचा मुलगा ४२, ४५ व ४९ वर्षांचे पुरुष व ४० वर्षांची महिला (एकूण ५) यांची कोविड चाचणी पाॅझिटीव्ह आली आहे. 
खामगाव, फलटण येथील पूर्वी पाॅझिटीव्ह आलेल्या व्यक्तीच्या निकट संपर्कातील ६२, २४, ५२,२५,२२,७०,व २६ वर्षीय पुरुष आणी ५५, ४५ व २० वर्षीय महिला (एकूण १०) यांची कोविड चाचणी पाॅझिटीव्ह आली आहे
 साखरवाडी येथील ५० वर्षीय पुरुषाची कोविड चाचणी पाॅझिटीव्ह आली आहे. सासवड येथील २४ वर्षीय महिलेची कोविड चाचणी पाॅझिटीव्ह आली आहे.
     तालुक्‍यात आज ४० रुग्ण सापडल्यामुळे महसूल विभाग आणि आरोग्य विभागाची मोठी धावपळ उडाली आहे. पहिल्या टप्प्यात  बाहेरून आलेले कोरोना बाधीत आढळून येत होते. सध्या स्थानिक देखील कोरोना बाधित आढळत आहेत.त्यांच्या संपर्कामध्ये आलेल्या क्वारंटाईन केले होते . यातील ४० जणांचा अहवाल हा आज "पॉझिटिव्ह' आला. तर मागील काही लोकांचे अहवाल प्रलंबित आहेत. 

 त्यामुळे तालुक्‍यात मोठी खळबळ उडाली आहे. विंचुर्णी येथील रूग्णाच्या निकट संपर्कातील लोकांचे स्वाब तपासणीसाठी पाठवले होते. तर फलटण शहरासह फलटण तालुक्यात काल आढळलेल्या ४० लोकांच्या संपर्कातील लोकांची तपासणी केली जाणार आहे. तालुक्‍यात आज ४० रुग्ण सापडल्यामुळे महसूल विभाग आणि आरोग्य विभागाची मोठी धावपळ उडाली आहे.पहिल्या टप्यात बाहेरून आलेले कोरोना बाधीत आढळून येत होते. सध्या स्थानिक देखील कोरोना बाधित आढळत आहेत.