आतित गावाजवळ असलेल्या वारणानगर (लांडेवाडी) येथे 2 कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने परिसरात खळबळ

आतित गावाजवळ असलेल्या वारणानगर (लांडेवाडी) येथे 2 कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने परिसरात खळबळ

उंब्रज/प्रतिनिधी

आतापर्यंत सुरक्षित राहिलेल्या सातारा तालुक्यातील नागठाणे,आतित,अपशिंगे,वेनेगाव विभागात पाहिले 2 पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने या विभागासह पूर्ण तालुक्यात खळबळ निर्माण झाली आहे. कोरोना पॉझिटिव्ह व्यक्ती ह्या ठाणे येथून नुकत्याच आपल्या गावी आले होते.कोरोना चाचणी तपासणी पॉझिटीव्ह झाल्यानंतर प्रशासन आता आणखी माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. 15 मे रोजी आतित गावापासून अवघ्या 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या वारणानगर ( लांडेवाडी)  या गावात खाजगी गाडीने 1 कुटुंब (2 पुरुष आणि 3 महिला) ठाणे येथून आले होते, गावातल्या सुज्ञ लोकाकडून आणि आरोग्य विभागाकडून त्यांना गावात असलेल्या प्राथमिक शाळेत थांबविण्यात आले, यांची वैद्यकीय तपासणी दरम्यान एक 65 वर्षीय वृध्दाला आणि 27 वर्षीय तरुणाला ताप व घश्याचा त्रास जानवू लागल्याने नांदगाव प्राथमीक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शनिवारी या दोघांच्या घश्यातील नमुने तपासनीसाठि पाठविले होते, रविवारी उशिरा या दोघांचे अहवाल पाँझेटिव्ह आले.

 त्यांना तात्काळ जिल्हारुग्णालयात दाखल करण्यात आले. वारणानगर (लांडेवाडी) सह परिसरातील नागरिकांची झोप या घटनेने उडालेली आहे. जिल्हाप्रशासन सतर्क झाले असून संपूर्ण गाव मायक्रो कंटेन्मेंट झोन करण्यात आले असून परिसरातील 3 किलोमीटर परिघात असलेली 5 गावे बफर झोन मध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत.याबाबत अधिक सखोल चौकशी सुरू केली आहे.संबंधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध सूरु असून कुटुंबाला होमकोरोनटाईन करणे तसेच आवश्यक असलेल्या तपासणी करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आलेली आहे.
                     
 सोमवारी सकाळपासून आरोग्य यंत्रणेसह प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली. प्रशासनाने तात्काळ वारणानगर (लांडेवाडी) हे गाव मायक्रो कंटेन्मेंट झोन केले तर परिसरातील वेनेगाव, जावळवाडी, निसराळे, खोडद. खोजेवाडी ही 3 किलोमीटर परिघातील गावे बफर झोन म्हणून जाहीर केले. कुटुंबातील इतर सदस्यांचे घशातील स्त्रावांचे नमुने सोमवारी उशिरा तपासणीसाठी पाठविण्यात आले जिल्ह्यधिकारी शेखर सिंह, सातारा प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, तहसीलदार आशा होळकर, गटविकास अधिकारी संजय ढमाळ, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. दा. गुं. पवार, नागठाणे आणि नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. आर. जे. कांबळे, डॉ. सि. पी. सातपुते, डॉ. एम. पी. रायबोळे यांनी भेट देऊन माहिती घेतली.ग्रामसेवक पवार, गाव कामगार तलाठी कुंभार, नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य सेवक, सेविका, अंगणवाडी सेविका, परिसरातील आशा सेविका, गावचे सरपंच आणि सर्व सदस्य यावेळी उपस्थित राहून गावातील 451 लोकांची आरोग्यतपासणी व माहिती घेत आहेत. बोरगाव पोलीस ठाण्याचे स.पो.नि. डॉ. सागर वाघ, स. उप.पो. नि. वर्षा डाळिंबकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी या गावात कडक बंदोबस्त करत आहेत तसेच बफर झोन सह परिसरातील गावामध्ये बंदोबस्त केला जात आहे.
                   
★★★★★★★★★★★★★★★★★★★★
 
मोठा मुलगाही जर्मन रिटर्न.

या कुटुंबातील मोठा मुलगा जर्मन येथे होता मार्च महिन्यात तो भारतात आला, तो थेट गावी आल्यानंतर गावाने त्याचे त्यावेळी विलगिकरणही केले होते.त्याची मुदत संपल्यानंतर व तो ठीक असल्याने त्यावेळी गावाने सुटकेचा निस्वास टाकला होता. मात्र आता त्याच्याच घरातील दोघे कोरोना पॉझिटिव्ह सापडल्याने गाव चांगलेच हादरले. आता या मोठया मुलाचीही तपासणी होणार असून पुन्हा एकदा त्याला विलगिकरणाला सामोरे जावे लागणार आहे. कुटुंबातील कोरोनाग्रस्त मुलगा हा ठाणे येथे होमगार्ड मध्ये असल्याचे समजते.