सातारा जिल्ह्यात आणखी दोन कोरोनाग्रस्त वाढले कराड तालुक्याला धक्का चरेगाव, बाबरमाची येथील रुग्ण

चरेंगाव ता.कराड मधील एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने उंब्रज परिसरात खळबळ उडाली आहे.तांबवे त्यानंतर डेरवण आणि आता चरेगाव अशी क्रमवारी नुसार रुग्ण निदर्शनास आले असून उंब्रज परिसर हा डेरवणच्या धक्क्यातून सावरत असतानाच आसपासच्या परिसरातील व्यक्ती पॉझिटिव्ह येत असल्याने नेहमी संपर्काचे असणारे ठिकाण उंब्रज हवालदिल होत आहे.

सातारा जिल्ह्यात आणखी दोन कोरोनाग्रस्त वाढले कराड तालुक्याला धक्का चरेगाव, बाबरमाची येथील रुग्ण

 

कराड येथे 2 अनुमानित रुग्णांचे कोरोना रिपोर्ट आले पॉझिटिव्ह 

सातारा (जिमाका) दि.19: कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथील 35 वर्षीय पुरुष आणि उपजिल्हा रुग्णालय कराड येथील 30 वर्षीय पुरुष अशा दोघा अनुमानित रुग्णांचे रिपोर्ट कोरोना (कोव्हिड 19) पॉझिटिव्ह असल्याचे बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय पुणे यांनी कळविले असून हे दोन रुग्ण कोरोनाबाधित असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
 रुग्णालयात दाखल असलेल्या या कोरोनाबाधित रुग्णांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर नियमानुसार निगराणीखाली उपचार सुरु आहेत.