कराड तालुक्यात ८ नवे कोरोना रुग्ण सातारा जिल्ह्याचा आकडा ५२ वर....

कराड तालुक्यात ८ नवे कोरोना रुग्ण  सातारा जिल्ह्याचा आकडा ५२ वर....
कराड तालुक्यात ८ नवे कोरोना रुग्ण  सातारा जिल्ह्याचा आकडा ५२ वर....

 

कराड येथे आढळले 8 पॉझिटिव्ह;
सहा आरोग्य कर्मचारी, एक गरोदर माता व एक निकट सहवासित

सातारा दि. 1 ( जि. मा. का ) : वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथे बाळंतपणासाठी आलेल्या कोविड बाधित गरोदर मातेच्या संपर्कात आलेले 6 आरोग्य कर्मचारी, 1 गरोदर माता व 1 निकट सहवासित असे एकूण 8  नागरिकांचा अहवाल कोविड-19   बाधित असल्याचे बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांनी कळविले आहे, प्राथमिक तपासण्यानंतर या सर्वांची प्रकृती स्थिर असून, विलगीकरण कक्षात लागू असलेल्या सर्व नियमानुसार काटेकोरपणे निगराणीखाली उपचार चालू आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.
आता सातारा जिल्ह्यात 42 रुग्ण कोविड बाधित असून आता पर्यंत 8 (कोविड 19) मुक्त होऊन रुग्णालयातून सोडले आहेत तर 2 जणांचा मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यात एकूण 52 कोविड-19 बाधित  रुग्णआढळले आहेत.
0000

 

 

कराडमध्ये कामाला असणारी उंब्रज मधील महिला कोरोना बाधित,तालुक्याचा आकडा वाढण्याची भीती

उंब्रज/प्रतिनिधी

 

कराड तालुक्यात ८ नवे कोरोना रुग्ण

सातारा जिल्ह्याचा आकडा ५२ वर....

कराड उपजिल्हा रुग्णालयातील 8 कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण


          कराड येथील वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयातील आठ कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. खबरदारी म्हणुन रुग्णालयातील सर्व कर्मचार्‍यांची कोरोना चाचणी घेण्यात आली होती. यामध्ये ६ कर्मचार्‍यांचे कोरोना अहवाल पोझिटिव्ह असल्याचे बी.जे. वैद्यकिय महाविद्यालय, पुणे यांनी कळवले आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डाॅ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.
               कराड शहरातील उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचार्‍यांनाच कोरोनाची बाधा झाल्यामुळे कराड आणि परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 
                 दरम्यान, कराड तालुक्यात महिणाभरात तालुक्यातील रुग्णसंख्या 41 वर पोहोचली आहे. सातारा जिल्ह्यातील अर्ध्याहून अधिक रुग्ण हे एकट्या कराड तालुक्यात असल्याने इथे प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. मात्र तरिही कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

उंब्रज ता.कराड मधील एक महिला कोरोना बाधित असल्याची माहिती मिळत असून सातारा जिल्ह्यातील रात्री १० च्या दरम्यान आलेल्या रिपोर्ट नुसार कराड तालुक्यातील आणखी काहीजण बाधित असल्याची माहिती मिळत असून हे सर्वजण एका ठिकाणी सेवा देत होते

उंब्रज मधील कोरोना बाधित असणाऱ्या २७ वर्षीय महिलेला आरोग्य विभागाने गुरुवारी रात्रीच राहत्या घरातून कराडला दवाखान्यात दाखल केल्याची माहिती मिळत आहे.

गुरुवारी रात्री रात्रभर पोलीस व आरोग्य विभाग उंब्रज येथील चोरे रोड परिसरात ठाण मांडून होते तसेच परिसरात कडेकोट बंदोबस्त लावला आहे तसेच सर्व परिसर सील करण्यात आला आहे

 

8 कोरोनाबाधित रुग्ण आढळले.

बाधीतांमध्ये 5 आरोग्य सेविकांचा समावेश

जिल्ह्यात एकूण 52 तर एकट्या कराडमध्ये 41 कोरोनाबाधित रुग्ण