धक्कादायक,कराड तालुक्यात आणखी १४ रुग्ण करोनाबाधित. रात्री उशिरा रिपोर्ट आले पॉझिटिव्ह. जिल्ह्यातील करोना रुग्णांची संख्या ६९.

कराड येथे आजच्या दिवसात कोरोनाचा कहर.. जिल्ह्यात एका दिवसात 25 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर तर एकट्या कराडात एका दिवसात 24 रुग्ण आणि साताऱ्यात 1 रुग्ण वाढला,जिल्ह्यात कोरोनाबधितांचा आकडा पोहचला 69 वर*

धक्कादायक,कराड तालुक्यात आणखी १४ रुग्ण करोनाबाधित. रात्री उशिरा रिपोर्ट आले पॉझिटिव्ह. जिल्ह्यातील करोना रुग्णांची संख्या ६९.

 

------------


वनवासमाचीला मोठा हादरा आणखी १४ जणांना कोरोना; एकट्या वनवासमाचीत  कोरोना बाधितांचा आकडा २६

कराड/प्रतिनिधी
   नुकत्याच हाती आलेल्या माहिती वरुन वनवासमाचीतील कोरोना बाधितांची संख्या २६  वर गेली असुन शुक्रवारी दिवसभरात १४ रुग्णाचे अहवाल कोरोना पाँझिटीव्ह आले आहेत. यामुळे प्रशासन हादरुन गेले असुन वाढत्या आकड्याने जिल्हा प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. 
  सध्या कोरोनाचे दाट सावट वनवासमाची गावावर आहे. येथे कोरोनाचा उद्रेक झाला असून शुक्रवारच्या आकड्याने पायाखालची वाळू सरकली आहे. गुरुवार पर्यत वनवासमाचीतील कोरोना बाधितांची संख्या १२ ,होती. सकाळी दोन रुग्ण सापडले तर रात्री प्राप्त झालेल्या अहवालानंतर नव्याने १२ रुग्ण आढळले आहेत. दरम्यान कोरोनाची चैन तोडण्यासाठी प्रशासनाकडून युध्दपातळीवर उपाययोजना सुरू आहेत. 

*जिल्ह्यात एका दिवसात 25 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर*

 *एकट्या कराडात एका दिवसात 24 रुग्ण आणि साताऱ्यात 1 रुग्ण*

*जिल्ह्यात कोरोनाबधितांचा आकडा पोहचला 69 वर*

--------------------------------------------------

कराड येथे निकट सहवासित 2 तर साताऱ्यात 1 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह;
94 नागरिकांचे  रिपोर्ट निगेटिव्ह
सातारा दि. 1 ( जि. मा. का ): सातारा जिल्ह्यात कराड कृष्णा मेडिकल कॉलेज येथे बाधित रुग्णाच्या निकट सहवासित 2 महिला (वय वर्षे 16 व 37) व क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा  येथे  मुबंईवरून 17 एप्रिल रोजी आलेला तरुण (वय वर्षे 27) घरात विलगीकरणामध्ये होता, सर्दी, खोकला म्हणून काल भरती झाला होता. अशा 3 नागरिकांचा कोरोना (कोविड 19)  अहवाल पॉझिटिव्ह आला असून ते कोरोना बाधित असल्याची माहिती बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांनी कळविले असल्याची माहिती  अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.  
तर क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा  येथील 20,  वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 71, व ग्रामीण रुग्णालय कोरेगाव येथील 3 अशा 94 नागरिकांचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्याची माहिती डॉ. गडीकर यांनी दिली आहे.  
आता सातारा जिल्ह्यात 45 रुग्ण कोरोना बाधित असून आतापर्यंत 8 (कोविड 19) मुक्त होऊन रुग्णालयातून सोडले आहेत तर 2 जणांचा मृत्यू झाला आहे.
0000