उंब्रज,कलेढोन,कुंभारगाव, म्हावशी 4 जणांचा अहवाल आला पॉझिटिव्ह

उंब्रज,कलेढोन,कुंभारगाव, म्हावशी 4 जणांचा अहवाल आला पॉझिटिव्ह

कोरोनामुक्तांची शंभरी पारःचारजण पॉझिटिव्ह
कलेढोण, कुंभारगांव, म्हावशी व उंब्रज येथील रूग्णांचा समावेश
सातारा/प्रतिनिधीः-
काल रात्री उशिरा सातारा तालुक्यातील चिंचनेर लिंब येथील मुंबई वरून आलेला 30 वर्षीय युवक, गादेवाडी ता. खटाव येथील 30 व 32 वर्षीय युवक,तसेच या नातेवाईकाच्या निकट सहवासातील 9 वर्षाची मुलगी, म्हासोली, ता.कर्‍हाड येथील 22 वर्षीय युवती व 28 वर्षीय युवक तसेच मेरुएवाडी येथील 33वर्षीय पुरुष, फलटण तालुक्यातील कोळकी येथील 74 वर्षीय पुरुष व फरडवाडी,ता. माण येथील 50 वर्षीय पुरुष, कवठे, ता. खंडाळा येथील 33 वर्षीय पुरुष,म्हासोली ता. कर्‍हाड  येथील 50 वर्षीय निकट सहवासित अशा एकूण 11 जणांचे अहवाल बुधवारी रात्री पॉझिटिव्ह आले होते. तर आज कोरोना रुग्णांची संख्या
वाढत असतानाच दुसरीकडे मात्र, कोरोनामुक्त होण्याचेही प्रमाण वाढत असल्याने प्रशासनाला दिलासा मिळत आहे. गुरुवारी जिल्हा शासकीय रुग्णालयातून आठ कोरोना बाधित रुग्ण पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. तर रात्री कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथे दाखल असलेले कलेढोण ता. खटाव येथील एक 45 वर्षीय पुरुष, कुंभारगाव ता. पाटण येथील  70
वर्षीय पुरुष, म्हावशी ता. पाटण येथील 45 वर्षीय पुरुष व ऊंब्रज ता. कराड येथील 40 वर्षीय पुरुष असे एकूण 4 जणांचा अहवाल कोरोनाबाधित आल्याची
माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
आत्तापर्यंत जिल्ह्यातून 106 जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यासाठी ही आंनदाची बातमी आहे. दरम्यान, आणखी 70 जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले असून, 129 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये दाखल असणार्‍या आठ कोरोनामुक्त रुग्णांना
गुरुवारी सकाळी आपापल्या घरी सोडण्यात आले. फलटण तालुक्यातील तरडगाव येथील 67 वर्षीय महिला, 6 वर्षाचा मुलगा, फलटण येथील 33 वर्षीय महिला,खंडाळा तालुक्यातील लोणंद येथील 13 वर्षांची मुलगी, कोडोली ता. सातारा येथील 18 वर्षांचा युवक, महाबळेश्वर येथील 23 वर्षीय पुरुष, त्रिपूटी ता.
कोरेगाव येथील 36 वर्षीय पुरुष व खटाव तालुक्यातील खरसिंगे या गावचा 18 वर्षीय युवक अशा एकूण आठजणांचा त्यामध्ये समावेश आहे.जिल्हा शासकीय रुग्णालय 34, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कर्‍हाड येथील 55, उपजिल्हा रुग्णालय, फलटण येथील 11, ग्रामीण रुग्णालय, वाई 7 व ग्रामीण रुग्णालय, कोरेगाव येथील 12, कृष्णा मेडिकल कॉलेज, कर्‍हाड येथील 10 अशा एकूण 129 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.70 जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहेत. त्यामध्ये जिल्हा शासकीय रुग्णालयात 13, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कर्‍हाड येथे 57 अशा एकूण 70 रुग्णांचा समावेश आहे. या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. जिल्ह्यात आत्तापर्यंत कोरोना बाधित झालेल्या रुग्णांची संख्या 181 झाली असून त्यामध्ये 106 जण कोरोनामुक्त होऊन घरी गेल आहेत. चारजणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.सध्या 71 कोरोना बाधित रुग्णांवर विविध ठिकाणी विलगीकरण कक्षात उपचार सुरू आहेत.