फलटण तालुक्यातील ६ वर्षीय मुलाला तर सातारा येथील दोन कैद्यांना कोरोना

फलटण येथील कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या ६ वर्षाच्या मुलास कोरोनाची लागण, फलटणच्या एकाच कुटुंबातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या एकुण झाली 3,सातारा जिल्हा कारागृहात आणखी दोन कैद्यांना कोरोनाची लागण,काल दोन कैद्याचे रिपोर्ट आले होते पाॅझीटीव्ह,पुणे येथील येरवडा कारागृहातुन सातारा कारागृहात आणलेल्या 46 कैद्यापैकी 4 जणांना कोरोनाची लागण ,सातारा जिल्ह्यात आतापर्यंत एकुण कोरोनाबाधित संख्या पोहचली 77 वर

फलटण तालुक्यातील ६ वर्षीय मुलाला तर सातारा येथील दोन कैद्यांना कोरोना

फलटण/प्रतिनिधी

फलटण तालुक्यातील ६ वर्षीय मुलाला कोरोना ची लागण झालेचे चित्र स्पष्ट झाले आहे.फलटण तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह संख्या ४ वर पोहचली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, तरडगाव येथिल पहिली कोरोना पॉझिटिव्ह मुलगी ही बुधवार दिनांक १५ एप्रिल रोजी तिचा अहवाल प्राप्त झाला त्यात ही कोरोना बाधित असल्याचे आढळून आल्याने फलटण तालुक्यात खळबळ उडाली आहे.मात्र शनिवार दिनांक २ मे रोजी सदरची कोरोना पॉझिटिव्ह मुलगी ही कोरोना मुक्त झाल्याची माहिती डॉ. गडीकर यांनी दिली आहे.
      सदर महिलेच्या संपर्कात आलेल्या लोकांना होम क्वारंटाइन करण्यात आले होते.त्यांचे  स्वॅब तपासणी साठी पाठवण्यात आले होते.बुधवार दिनांक २९ एप्रिल रोजी सदर रग्णाचे घेतलेल्या नमुन्यांपैकी पहिल्या पाॅझिटिव्ह रुग्णाच्या आणखी एका ६ वर्षीय कुटुंबीय व्यक्तींची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. अजुनही त्या कुटुंबातील ३ व्यक्तींचे अहवाल प्रलंबित आहेत. अशी माहिती उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप यांनी दिली आहे.फलटण एकूण कोविड संख्या - ४ वर जाऊन पोहचली आहे.