फलटण तालुक्यात कोविड पॉझिटिव्ह रुग्णात भर

फलटण तालुक्याची डबल सेंच्युरी पुर्ण

फलटण तालुक्यात कोविड पॉझिटिव्ह रुग्णात भर

फलटण / प्रतिनिधी- 

फलटण तालुक्यात कालच सोमवार दिनांक २० जून रोजी तब्बल ४० रुग्ण आढळले होते, त्यामुळे संपूर्ण शहरासह  तालुका हदरला होता‌.
कोळकी येथील पूर्वी पाॅझिटीव्ह आलेल्या व्यक्तीच्या निकट संपर्कातील ३ व १० वर्षांची मुले, ३३ व ६० वर्षांच्या महिला व ४० वर्षीय पुरुष (एकूण ५) यांची कोविड चाचणी पाॅझिटीव्ह आली आहे. 
        
तर गोळीबार मैदान, फलटण येथील पूर्वी पाॅसिटीव्ह आलेल्या व्यक्तीच्या निकट संपर्कातील २४ , २९ व ३३ वर्षीय पुरुष  ( एकूण ३) यांची कोविड चाचणी पाॅझिटीव्ह आली आहे,त्या बरोबरच रविवार पेठ, फलटण मधील ५३ वर्षीय महिला व ५८ वर्षीय पुरुष यांची तसेच जिंती नाका, फलटण येथील ३६ वर्षीय पुरुषाची कोविड चाचणी पाॅझिटीव्ह आली आहे.एकूण ११ जणांचे अहवाल पाॅझिटीव्ह आले असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप यांनी दिली आहे.निकट संपर्कामध्ये आलेल्या व्यक्तींची माहिती घेण्याचे काम सुरु आहे.अशीही माहिती उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप यांनी दिली आहे.