वाई तालुक्याचा पश्‍चिम भाग बनतोय कोरोनाचे केंद्रबिंदू...

वाई तालुक्याचा पश्‍चिम भाग बनतोय कोरोनाचे केंद्रबिंदू...

दौलतराव पिसाळ-/वाई प्रतिनिधी 
दि.23

वासोळे तालुका. वाई या गावात दि.18 रोजी कुटुंबासमवेत नवी मुंबई वरून वासोळे या मूळ गावी आला होता. त्याला वासोळे येथील प्राथमिक शाळेमध्ये कोरनंटाईन केले होते. दि 20 रोजी त्याला अचानक ताप आल्याने त्याला औषधी उपचारासाठी वाईच्या ग्रामीण रुग्णालयात पाठवले होते तेथून स्वॉब चे नमुने घेऊन ते तपासणीसाठी सातारा येथील शासकीय रुग्णालयात पाठवले होते. त्याचा रिपोर्ट आज सकाळी पॉझिटिव आल्याची बातमी वासोळे गावात येऊन धडकली त्यामुळे वाईचा पश्चिम भाग हादरुन गेला. दि. 21 रोजी नुकताच आसरे तालुका. वाई या गावात मुंबईवरून कुटुंबासह आलेला पॉझिटिव्ह असल्याचा रूग्ण सापडल्याने आसरे गावासह पश्चिम भागामध्ये खळबळ उडाली होती. त्यात आणखी भर म्हणून वासोळे या गावच्या काळे वस्तीत नव्याने रुग्ण सापडल्याने वाई तालुक्यातील गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याची माहिती वाईच्या महसूल प्रशासन, आरोग्य प्रशासन, विभागाला व पोलीस प्रशासन यांना माहिती मिळाल्यानंतर ही सर्व शासकीय यंत्रणा वासुळे तालुका वाई या गावी तातडीने दाखल झाली आहे.