वाई तालुक्यात 7 कोरोनाबाधित रुग्णांमुळे खळबळ

वाई तालुक्यात 7 कोरोनाबाधित रुग्णांमुळे खळबळ

वाई / दौलतराव पिसाळ
वाई तालुक्यातील पाचवड व्याजवाडी आणी वेळे या गावांन मध्ये कोरोनो रोगाचा फैलाव गतीमान  होऊन   आज तब्बल  ७ कोरोनो पॉझिटीव्ह रुग्ण  सापडल्याने   वाई तालुक्यात खळबळ ऊडाली आहे त्याच बरोबर नागरीकांन मध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे 
सविस्तर माहिती अशी की वाई तालुक्याच्या पश्चिम भागातील अनेक गावांन मध्ये मुंबई वरुन आलेल्या अनेकांचे कोरोनो पॉझिटीव्ह रिपोर्ट आल्यामुळे हा हा कार माजला होता त्यात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले होते काल पर्यंत पश्चिम भाग शांत असतानाच आज पुर्व भागातील पाचवड 3 व्याजवाडी ३ आणी वेळे या गावात 1 असे ७  रुग्णांचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्यामुळे वाई तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे त्या मुळे नागरिकांन मध्ये भितीचे  वातावरण निर्माण झाले आहे 
कोरोनो रोगाचा फैलाव थोपविण्या साठी वाईचे तहसीलदार रणजित भोसले गटविकास अधिकारी उदय केसुरकर,पोलिस निरीक्षक आनंदराव खोबरे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ, संदीप यादव मालतपुर प्राथमीक आरोग्य केंद्राच्या डॉक्टर रेवती जोशी बावधन प्राथमीक आरोग्य केंद्राच्या डॉक्टर योजना तराळ भुईंज आणी कवठे प्राथमीक आरोग्य केंद्राचे डॉक्टर ठोंबरे आरोग्य सेविका  3आशा ताई ग्राम रक्षक समिती असे सर्वजण दिवस  रात्र प्रयत्नांची पराकाष्ठा करीत असताना सुध्दा कोरोनो रोगाचा विळखा दिवसे दिवस घट्ट च होत असल्याने शासकीय यंत्रणे वर त्याचा तान वाढला आहे