वाई नगरपालिकेला कोरोनाचा हादरा

सहा सफाई कर्मचारी कोरोनाबाधित,नागरिकांच्यात भीती

वाई नगरपालिकेला कोरोनाचा हादरा

वाई / दौलतराव पिसाळ 

वाई नगर पालिकेतील आरोग्य विभागाचे प्रमुख असलेलेच कोरोनो पॉझिटीव्ह आले होते आज त्यांच्या निकट संपर्कातील ४० कामगारांन पैकी आज दि, २७ रोजी  ६ सफाई कामगारांचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्यामुळे या गरीब कामगारांमध्ये खळबळ उडाली आहे तर बाकीच्या कामगारांमध्ये भिंतीचे वातावरण निर्माण झाले आहे 

यामध्ये आणखी भर पडण्याची शक्यता आहे कोरोनोच्या या दणक्याने वाई नगर पालिकेतील सर्व विभागांच्या प्रमुख अधिकारी आणी कर्मचार्यांन मध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे तर कोणीही अधिकारी आणी कर्मचार्यांनी घाबरून जाऊ नये तुमच्यावर आलेल्या संकटांना तोंड देण्यासाठी पालिका मुख्याधिकारी या नात्याने सदैव तुमच्या सोबत आहे असे आवाहन  पालिकेच्या मुख्याधिकारी विद्या देवी पोळ यांनी केले आहे