भारतरत्न इंदिरा नगर येथील महिलेचा कोरोनाने मृत्यू जिल्हाधिकारी यांची माहिती

सोलापूर शहरातील इंदिरानगर परिसरातील 69 वर्षीय महिलेचा आज (रविवारी) कोरोनामुळे मृत्यू झाला. गेल्या रविवारी (ता. 12) सोलापुरात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला व त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर आठ दिवसात आज (रविावर, ता. 19) दुसऱ्या कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्या महिलेच्या संपर्कात आलेल्या आठ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली असून त्यांचे रिपोर्ट प्रलंबित असल्याची माहिती सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.

भारतरत्न इंदिरा नगर येथील महिलेचा कोरोनाने मृत्यू जिल्हाधिकारी यांची माहिती

सोलापूर/प्रतिनिधी 

सोलापूर शहरातील इंदिरानगर परिसरातील 69 वर्षीय महिलेचा आज (रविवारी) कोरोनामुळे मृत्यू झाला. गेल्या रविवारी (ता. 12) सोलापुरात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला व त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर आठ दिवसात आज (रविावर, ता. 19) दुसऱ्या कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्या महिलेच्या संपर्कात आलेल्या आठ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली असून त्यांचे रिपोर्ट प्रलंबित असल्याची माहिती सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. 
या महिलेबाबत जिल्हा प्रशासनाला शनिवारी (ता. 18) रात्री माहिती मिळतात सोलापूर शहर पोलिस व महापालिकेच्यावतीने इंदिरानगर, 70 फूट रोड हा परिसर सील करण्यात आला आहे. या भागातील नागरिकांची तपासणी केली जात आहे. सोलापूर शहरात आतापर्यंत कोरोनाचे 15 रुग्ण सापडले असून त्यातील दोन जणांचा मृत्यू झाला आहे. उर्वरित 13 जणांवर सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जिल्हा प्रशासनाच्यावतीने विविध प्रतिबंधात्मक उपाय योजना राबविण्यात येत असल्याची माहितीही जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. 
सोलापूर जिल्ह्यातील 718 व्यक्तींना आयसोलेशन वॉर्डात ठेवण्यात आले आहे. त्यांची कोरोना चाचणी घेण्यात आली असून त्यापैकी 505 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले आहेत. त्यातील 490 जण हे निगेटिव्ह आले आहेत तर 15 जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. 213 जणांचे रिपोर्ट अद्यापही प्रलंबित असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.