सोलापुरात पुन्हा ५ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले.

सोलापूर शहरातील कोरूना बाधित रुग्णांची संख्या वरचेवर वाढत चालली आहे. कोरोना बाधित रुग्णांची संख्या आत्ता पर्यंत ३० इतकी झाली आहे. त्यापैकी तीन लोक मयत व उर्वरित २७ जणांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सोलापुरात पुन्हा ५ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले.

सोलापूर (प्रतिनिधी)

सोलापूर शहरातील कोरूना बाधित रुग्णांची संख्या वरचेवर  वाढत चालली आहे. 
कोरोना बाधित रुग्णांची संख्या आत्ता पर्यंत ३० इतकी झाली आहे. त्यापैकी तीन लोक मयत व उर्वरित २७ जणांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मंगळवारी तपासणीमध्ये पाच रुग्ण वाढले असून,त्यापैकी चार रुग्ण सारी चे आहेत.तर एक रुग्ण कोरोणाचा आहे. वाढलेले रुग्ण हे मोदीखाना शास्त्रीनगर जोशी गल्ली, शनिवार पेठ, मदर इंडिया झोपडपट्टी, या परिसरातील आहेत.त्यामुळे यापूर्वी सोलापूर शहरात सहा कन्टेन्टमेंट  झाले होते.त्यामध्ये आता वाढ होऊन  मोदीखाना,शास्त्रीनगर, शनिवार पेठ,मदर इंडिया झोपडपट्टी या ठिकाणांची वाढ होऊन ९ कंटेनमेंट झोन  झाले आहेत.
जिल्हाधिकारी मिलिंद  शंभरकर यांनी घोषित केली आहेत.
कोरोना चे सोलापूर येथे मिळालेले सर्व रुग्ण हे गवसु अंतर्गत झोपडपट्टी भागातील आणि दाट वस्ती भागात च आढळून आले आहेत. गवसु अंतर्गत झोपडपट्टी च्या भागात आणि दाट वस्ती च्या भागात जास्त लक्ष देणे गरजेचे असताना सोलापूर महानगरपालिका आणि आरोग्य खात्याकडून दुर्लक्ष होत आहे. शहरात झोपडपट्टी भागात कोणतीच काळजी घेतली जात नाही त्यामुळे दिवसेंदिवस रुग्ण वाढू लागल्या मुळे शहरातील नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे.