पाटण तालुक्यातील बनपूरी येथील 43 वर्षीय कोरोना संशयित महिलेचे निधन

पाटण तालुक्यातील बनपूरी येथील 43 वर्षीय कोरोना संशयित महिलेचे निधन

मल्हारपेठ प्रतिनिधी 
विकास कदम 


प्राथमिक आरोग्य केंद्र सळवे ता. पाटण अंतर्गत उपकेंद्र बनपूरी येथील संशयीत कोव्हीड -१९ रुग्ण सुनीता अशोक जाधव वय ४३ स्त्री हे दिनांक १५ / ०५ /२०२० रोजी मुंबईहून ( पत्ता रूम नंबर ३ अमृत रहिवाशी सेवा संघ एस.एन दुवे रोड कोकणीवाडा दहिसर पूर्व मुंबई ) येथून खाजगी मिनीबसणे कुटुंबासह ( एकूण ८ व्यक्ती ) दि. १६ /०५ /२०२० रोजी सकाळी ६ वाजता बनपुरी येथे पोहचले व नंतर त्यांना नायकबा हायस्कूल बनपूरी येथे वीलगीकरण कक्षात ठेवण्यात आले व त्यादिवशी ग्रामपंचायत दक्षता कमेटी व आरोग्य सेवक हे सकाळी १०:३० वाजता तेथे जाऊन त्यांना 'A' फॉर्म व विलगीकरण आवहाल पत्र देण्यात आले व त्या सर्वांना आरोग्य शिक्षण देण्यात आले. तसेच १५/०५/२०२० रोजी दुपारी ३ वाजता त्यांना आरोग्य सेवक व आशा सेविका यांच्या मार्फत भेट देण्यात आली व त्यावेळी त्यांना चेकप केले तेव्हा सुनीता अशोक जाधव यांना ताप, सर्दी व इतर कुटलीही लक्षण आढळून आलेली नाहित.

संध्याकाळी ०७:४५ दरम्यान मा. उपसरपंच बनपूरी यांचा फोन संदेश वरून सदर व्यक्तीची अचानक तब्बेत बिगडल्यामुळे मा.वैद्यकीय अधिकारी प्रा. आरोग्य केंद्र सळवे यांना फोनद्वारे माहिती देण्यात आली. त्यांच्या नातेवाईकांकडून १०८ ला फोन करण्यात आला. अँब्यूलन्स येण्यासाठी उशीर होतं असल्यामुळे वैद्यकीय अधिकारी यांच्या सुचनेवरून रुग्णाला प्रा.आरोग्य केंद्र अँब्यूलन्स मधून ग्रामीण रुग्णालय ढेबेवाडी येथे आणण्यात आले.

ग्रामीण रुग्णालय येथील वैद्यकीय अधिकारी यांनी कराड येथे नेण्यास सांगितले कृष्णा हॉस्पिटल कराड येथे नातेवाईक यांच्या म्हणण्यानुसार रुग्णाचा मृत्यू झाला असे सांगण्यात आले. तेथून संबधीत नातेवाईक यांनी रुग्णास बनपूरी येथे रात्री १०:३० च्या सुमारास घेऊन आले. सदर माहिती ही तालुका आरोग्य अधिकारी यांना फोन द्वारे कळवण्यात आले व त्यांच्या सुचनेनुसार प्रा.आरोग्य केंद्र अँब्यूलन्स द्वारे बनपूरी येथून ग्रामीण रुग्णालय कराड येथे सकाळी ४:३० वाजता नेण्यात आले. तसेच नातेवाईक यांची रुग्णाबाबत चौकशी करून स्वाँबचे नमुने घेण्यात आले व नगरपालिकेच्या अँब्यूलन्स मधून मृतदेह सकाळी १०:१५ वाजता नियोजित ठिकाणी दहन करण्यात आले. तरी त्याचा स्वाँबचा नमुना अहवाल दोन दिवसानंतर प्राप्त होईल असे सांगण्यात आले आहे.