श्वसन संस्थेच्या तीव्र जंतु संसर्गामुळे दोघांचा मृत्यु ; दोन्ही संशयित कराड तालुक्यातील

श्वसन संस्थेच्या तीव्र जंतु संसर्गामुळे दोघांचा मृत्यु ; दोन्ही संशयित कराड तालुक्यातील

श्वसन संस्थेच्या तीव्र जंतु संसर्गामुळे दोघांचा मृत्यु ;

40 अनुमानित विलगीकरण कक्षात दाखल 
सातारा दि.20 (जि.माका) :   क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे 4 नागरिकांना बाधित रुग्णाचे निकट सहवासित म्हणून तर 2 नागरिकांना श्वसन संस्थेच्या तीव्र जंतु संसर्गामुळे व प्रवास करुन आलेले 2 नागरिक आणि 1 आरोग्य कर्मचारी असे एकूण 9 जणांना तर कृष्णा मेडिकल, कॉलेज, कराड येथे बाधित रुग्णाचे निकट सहवासित म्हणून 22 नागरिक व श्वसन संस्थेच्या तीव्र जंतु संसर्गामुळे 7 नागरिकांना तसेच उपजिल्हा रुग्णालय, कराड येथे 4 असे एकूण 42 नागरिकांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. यापैकी कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे विलगीकरण कक्षात दाखल असणाऱ्या 70 वर्षीय महिला व उपजिल्हा रुग्णालय, कराड येथे दाखल असणाऱ्या 32 वर्षीय पुरुष या दोघांचा मृत्यु  श्वसन संस्थेच्या तीव्र जंतु संसर्गामुळे झाला आहे. या दोघांच्या घशातील स्त्रावांचे नमुने संशयित म्हणून बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले असून उर्वरित 40 नागरिकांच्या  घशातील स्त्रावांचे नमुनेही   बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे, अशी माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.