रमजानच्या उपवासात मुस्लिम बांधवांची मदत , लॉकडाऊन मध्ये गरजूंना केले धान्य वाटप

रमजानच्या उपवासात मुस्लिम बांधवांची मदत , लॉकडाऊन मध्ये गरजूंना केले धान्य वाटप
उंब्रज येथील मुस्लिम बांधवांनी गरजु कुटुंबातील नागरिकांना जीवनावश्यक वस्तूचे वाटप केले.

रमजानच्या उपवासात मुस्लिम बांधवांची मदत

 

लॉकडाऊन मध्ये गरजूंना केले धान्य वाटप ; चांगल्या कार्यात कायम सहभाग

 

उंब्रज / प्रतिनिधी

 

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर गेले दिड महिन्यापासून लॉकडाऊन परिस्थितीत असणाऱ्या गरजु व गरीब कुटुंबातील लोकांना  उंब्रज ता.कराड येथील मुस्लिम समाजाच्या वतीने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.रमजान महिन्याच्या उपवासात मुस्लिम बांधवांनी पुढे केलेला मदतीचा हात हिंदू- मुस्लिम ऐक्याचे प्रतिक ठरला आहे. 

 

उंब्रज ता.कराड येथील मुस्लिम समाज बांधव हा सर्वासाठी संकटकाळात धाऊन आला आहे.प्रत्येकाच्या खांद्याला खांदा लावून आलेल्या अडचणीसाठी पुढे येत असल्याने गावात कायमच ऐक्य दिसून आले आहे.कोरोना महामारी आजाराच्या अनुषंगाने गेले दिड महिन्यापासून उद्योग धंदे बंद असल्याने हातावरील पोटाला काम नसल्याने अनेकांना हाल अपेष्टा सामोरे जावे लागत असल्याने येथील मुस्लिम बांधव एकत्रित येऊन मदत करण्याचे ठरविले.जो तो आपल्या परीने मदत देत कांदे,लसूण, तांदूळ, गहू यासह अन्य जीवनावश्यक वस्तू एकत्रित जमा केल्या आणि येथील एकूण सहा वार्डातील प्रत्येक वार्डात ज्या कुटुंबाला खरोखर गरज आवश्यकता आहे अशा कुटुंबियांची यादी तयार करून प्रत्येक वार्डातील ५० कुटुंबाना जीवनावश्यक वस्तूचे सुमारे ३०० पेक्षा जास्त कुटुंबियांना वाटप केले.यामध्ये नौशाद मोमीन, बिलाल मनेर,जुबेर मोमीन, महबूब मुल्ला, सुहेल मुल्ला, जमीर डांगे, अय्याज पटवेकर यांच्यासह शेकडो मुस्लिम बांधवांनी मदतीचा हात पुढे गरजुंना मदत केली.