विहिरीत पोहणाऱ्या सात जणांवर गुन्हा, उंब्रज येथील घटना

जमावबंदी व संचारबंदीच्या आदेशाचा भंग केल्या प्रकरणी विहिरीत पोहणाऱ्या ७ जणांवर उंब्रज पोलीसांनी गुन्हा नोंद केला आहे.सदरची कारवाई रविवार दि.२९ रोजी दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.

विहिरीत पोहणाऱ्या सात जणांवर गुन्हा, उंब्रज येथील घटना

उंब्रज / प्रतिनिधी

जमावबंदी व संचारबंदीच्या आदेशाचा भंग केल्या प्रकरणी विहिरीत पोहणाऱ्या ७ जणांवर उंब्रज पोलीसांनी गुन्हा नोंद केला आहे.सदरची कारवाई रविवार दि.२९ रोजी दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.

अक्षय जाधव (वय२२),प्रसाद जाधव (वय२१),संभाजी जाधव (वय२७),योगेश घाडगे (वय२०),ओंकार घाडगे (वय२२)किशोर पाटणकर  (वय२१)वैभव राऊत (वय२४)
सर्व रा.उंब्रज ता.कराड अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नांवे आहेत.

याबाबत पोलिसांची माहिती अशी,
उंब्रज ता.कराड गावचे हद्दीत उंब्रज ते चोरे जाणाऱ्या रोडलगत असणाऱ्या विहिरीत पोहण्यासाठी सात जणांनी एकत्रित येऊन कोरोनो प्रादुर्भाव रोखण्यासाठी जारी केलेल्या जमावबंदी, संचारबंदीचे उल्लंघन करुन व आपत्ती निवारण कायद्यातील तरतुदीचे उल्लंघन केल्या प्रकरणी सात जण मिळून आले यांच्यावर उंब्रज पोलिसांनी गुन्हा दाखल केला.