शिरगावच्या सरपंचांना दोघांची मारहाण

याबाबत शिरगाव ता कराड गावचे सरपंच रामचंद्र कृष्णा सुतार वय ५० यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार १ व ३ एप्रिल रोजी झालेल्या भांडणाचा राग मनात धरुन दोघांनी मारहाण केल्याची फिर्याद दिली आहे

शिरगावच्या सरपंचांना दोघांची मारहाण

उंब्रज/प्रतिनिधी


याबाबत शिरगाव ता कराड गावचे सरपंच रामचंद्र कृष्णा सुतार वय ५० यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार १ व ३ एप्रिल रोजी झालेल्या भांडणाचा राग मनात धरुन आमचे गावातील १) शाहु सयाजीराव पाटील २) श्रीकृष्ण उर्फ गोप्या सयाजीराव पाटील दोन्ही रा शिरगाव ता कराड यांनी माझ्या मुलाला फोन करुन तु व तुझा बाप कोठे आहे असे विचारले व थोड्याच वेळात ते दोघे आमचे शेतात त्यांचे मोटार सायकल वरुन आले गाडी उभी करुन मला शिव्या देत शाहु पुढे आला मा जिल्हा दंडाधिकारी सो सातारा यांनी शस्त्र बंदी आदेश जारी केला आसताना तो हातात मोठा चाकु घेवुन आला होता. म्हणुन त्यावेळी तेथे हजर असणारे माझे मित्र संतोष यादव,अरविंद महाडिक, यांनी थांबवायचा प्रयत्न केला तुम्ही शांत रहा आपण काय असेल तो प्रकार मिटवुन घेवु असे सांगत असतान शाहु पाटील याने त्याच्या हातातील चाकु मला मारण्यासाठी उगारला. त्यावेळी संतोष यादव व अरविंद महाडिक यांनी त्यास आडवले असता, सदरचा चाकु त्यांच्या हाताला लागला आहे. त्यावेळी श्रीकृष्ण उर्फ गोप्या पाटील याने माझ्या मुलाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी दिली आहे त्यावेळी माझी पत्नी सोडविण्यासाठी मध्ये आली असता तीलाही शिवीगाळ करुन ढकलुन दिले आहे.म्हणुन माझी त्यांचे विरुध्द तक्रार आहे.