तांबवे गांव कोरंटाईन करण्याचा प्रशासनाचा विचार,मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त

तांबवे गावातील एका रुग्णाचा कोरोना बाधीत अहवाल आज गुरुवारी दुपारी आला. त्यामुळे गावात एकच खळबळ उडाली आहे. गावातील बांधीत व्यक्तीच्या कुटुंबीयांसह त्याच्या संपर्कात आलेल्या अन्य काहीजणांनाही आरोग्य विभागाने आज तपासणीसाठी नेले. गावामध्ये अधिकाऱ्यांन दुपारपासुनच तळ ठोकला आहे. पुर्ण गाव कोरंटाईन करण्याचा प्रशासनाकडुन रात्री उशीरापर्यंत वरिष्ठांशी विचार सुरु होता. दरम्यान पोलिस बंदोबस्तही मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर परदेशातुन आणि पुण्या-मुंबईसह अन्य राज्यातुन आलेल्यांची तपासणी आऱोग्य विभागामार्फत करण्यात येत आहे. त्यामध्ये मुंबईवरुन 21 मार्चला आलेल्या एकाचा अहवाल कोरोनाबाधीत आल्याचे आज दुपारी स्पष्ट झाले. त्यानंतर गावामध्ये खळबळ उडाली. गावामध्ये कराड तालुक्यातील पहिलाच बाधीत रुग्ण तांबवे गावात सापडल्याने प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार अमरदीप वाकडे, गटविकास अधिकारी आबासाहेब पवार, तालुका वैद्यकीय अधिकारी संगीता देशमुख, कराड तालुका पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ, सुपने प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. स्नेहा हुंदरे यांनी तातडीने गावात भेट दिली. दुपारपासुन रात्री उशीरापर्यंत ते गावातच होते. त्यांनी जिल्हा परिषद सदस्य प्रदीप पाटील, सरपंच जावेद मुल्ला, उपसरपंच धनंजय ताटे, ग्रामविकास अधिकारी टी.एल. चव्हाण यांना गावात करण्याच्या उपाययोजनांची माहिती दिली. काही सुचनाही त्यांनी केल्या. पुर्ण गाव कॉरंटाईन करण्याबाबत प्रशासनाकडुन कार्यवाही सुरु करण्यात आली आहे. पोलिस बंदोबस्तही मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आला आहे. गावातील कोणीही बाहेर पडणार नाही, बाहेर आल्यास संबंधितावर गुन्हे दाखल करण्यात येतील असे पोलिसांनी सांगितले. दरम्यन गावातील संबंधित व्यक्ती ज्यांच्या संपर्कात आली होती त्यांनी स्वतःहुन आवश्यक त्या आरोग्य तपासणीसाठी प्रशासन, आरोग्य विभागाला माहिती द्यावी. त्यांनी स्वतःहुन तपासणी करन घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
............................