लॉक डाऊनच्या नावा खाली व्यापाऱ्यांकडून जनतेची लूट

वाई तालुक्यातील गावागावात व वाई शहरात पोलीस आणि महसुल यांच्या साक्षीने किराणा दुकानदार व भाजीपाला विक्रेते यांच्याकडून भरमसाठ चढ्या दराने जीवनावश्यक वस्तूंची विक्री जोमात सुरू असल्याने तालुक्यातील जनतेची आर्थिक लूट होत आहे.

लॉक डाऊनच्या नावा खाली व्यापाऱ्यांकडून जनतेची लूट

वाई /प्रतिनिधी - दौलतराव पिसाळ

वाई तालुक्यातील गावागावात व वाई शहरात पोलीस आणि महसुल यांच्या साक्षीने किराणा दुकानदार व भाजीपाला विक्रेते यांच्याकडून भरमसाठ चढ्या दराने जीवनावश्यक वस्तूंची विक्री जोमात सुरू असल्याने तालुक्यातील जनतेची आर्थिक लूट होत.आहे वास्तविक पाहता सातारा जिल्हा अधिकारी यांनी दिलेले लॉकडावून त्याचे तंतोतंत किरकोळ अपवाद वगळता नागरिकांनी त्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आहे पण दुर्दैवाने या लॉकडावून काळामध्ये पोटाची खळगी भरण्या साठी लागणारे अन्नधान्य व भाजीपाला चढ्या दराने होत असलेल्या विक्रीवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी व जनतेची दिवसाढवळ्या होत असलेली आर्थिक लूटमार थांबवण्यासाठी जिल्हा अधिकारी कार्यालयातील जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी चढ्या दराने विक्री करणाऱ्या किराणा दुकानदार व भाजीपाला विक्रेते यांच्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी पथक पाठवणे गरजेचे असताना देखील अशा पध्दतीचे वाई तालुक्यासह जिल्ह्यात कुठेही गुन्हे दाखल झाल्याचे दिसून आले नाही.एका बाजूला राज्यशासनाने जनतेच्या हितासाठी आणि कोरोना सारख्या अति भयंकर रोगावर मात करण्यासाठी पोलीस बळाचा वापर करुन काही अपवाद वगळता संपुर्ण वाई तालुक्यातील नागरिक घराघरांत डांबून ठेवले आहेत डांबून ठेवलेल्या नागरिकांवर उपासमारीचे संकट कोसळू नये व त्यांच्या दोनवेळच्या जेवणाची सोय व्हावी यासाठी महसूल प्रशासनाच्या अधिकारी वाई शहरातील मर्जीतील किराणा व्यापारी व भाजीपाला विक्रेते व्यापारी यांच्या अधिकृत शासकीय विक्रेता म्हणून प्रमाणपत्र देवून नेमणुका केल्या आहेत व त्यांना जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी प्रत्येक वस्तू विक्रीचे दरपत्रक देवून याच दराने मालाची विक्री करावी असे आदेश दिल्याचे समजते पण किराणा व भाजीपाला विक्रते व्यापाऱ्यांनी ठरवून दिलेल्या दरपत्रकाला केराची टोपली दाखवून दिलेला आदेश धुडकावून पोलीस व महसूल खात्याच्या प्रशासनाच्या साक्षीने चढ्या दराची विक्री सुरू करून हे मालामाल होताना दिसत आहेत तर संचारबंदीच्या नावाखाली घराघरात डांबलेल्या नागरिकांची पिचलेल्या अवस्थेत दिवसाढवळ्या लूटमार होताना दिसत आहे त्यामुळे प्रशासनाच्या आदेशाने लॉकडावूनच्या नावाखाली डांबलेले नागरीक दिवसेंदिवस भिकेला लागण्याच्या उंबरठ्यावर उभे आहेत.जनतेशी निगडित असलेल्या या गंभीर प्रश्नाकडे जिल्ह्याचे नव निर्वाचित व कर्तव्यदक्ष असलेले जिल्हाधिकारी सिंग हे लक्ष घालतील का ?असा संतप्त सवाल पिचलेल्या नागरिकांमधून विचारला जात आहे 
चौकट-सध्या बाजारात तेल डबा 1600 त 1700 किरकोळ तेल 150 रुपये किलो, सर्व डाळी 100 ते 130रुपये किलो,खोबरे 260 रुपये किलो, साखर 50 ते 55 रुपये किलो तर बिस्कीट पुडा ते तंबाखची पुडी डबल तिबल भावाने ग्राहकांच्या माथी मारण्याचे पाप केले जात आहे भाजीपाला ही अव्वाच्यासवा दराने विकला जात आहे बटाटे 40 ते 45 रुपये किलो, कांदे 30 ते 35 रूपये किलो तर भेंडी गवारी मिरची,वांगी व अन्य भाज्यांचे दर 120 रुपये पर्यंत पोचवल्याने सर्व सामान्यांना इतरवेळी परवडणारा भाजीपाला कडू लागत आहे. शासनाने ठरवलेले दर व सध्या बाजारात व्यापाऱ्याचे दर यामध्ये मोठी तफावत दिसून येत असल्याने या सर्वांचे स्टिंग ऑपरेशन होणे गरजेचे आहे