कोरोना येईल; जाईल, आधी मुलांना शिकवा - रमेश देशमुख

कोरोना, ऑनलाईन, ऑफलाईनच्या गोंधळात मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. ऑनलाईन शिक्षण चांगले असल्याचे शिक्षण विभागाने म्हटले. मात्र, मुलांना काहीच येत नसल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे परीक्षा ऑनलाईन अथवा ऑफलाईन घ्या. परंतु, त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ देऊ नका.

कोरोना येईल; जाईल, आधी मुलांना शिकवा - रमेश देशमुख
रमेश देशमुख (उपसभापती : पंचायत समिती, कराड)

कोरोना येईल; जाईल, आधी मुलांना शिकवा - रमेश देशमुख 

पंचायत समिती मासिक सभा :  लसीकरणाची उदिष्ट पुर्तीकडे वाटचाल 

कराड/प्रतिनिधी : 
          ऑनलाईन शिक्षण प्रणाली चांगली असल्याचे शिक्षण विभागानेही सांगितले होते. मात्र, अजूनही परीक्षा झाल्या नसल्याबाबत विचारणा केली असता, ऑफलाईन परीक्षा घेण्याबाबतची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती गट शिक्षण अधिकारी मुजावर मॅडम यांनी दिली. यावर ऑनलाईन असो वा ऑफलाईन, तात्काळ परीक्षा सुरु करा. कोरोना, ऑनलाईन, ऑफलाईनच्या गोंधळात मुलांचे शैक्षणिक नुकसान होत असून कोरोना येईल; जाईल, आधी मुलांना शिकवा, अशाप्रकारे शिक्षण विभागाची कानउघाडणीच उपसभापती रमेश देशमुख यांनी केली. 
        येथील पंचायत समितीच्या सभाग्रहात बुधवारी 3 रोजी मासिक सभा पार पडली. सभापती प्रणव ताटे सभेच्या अध्यक्षस्थानी होते. सभेदरम्यान, शिक्षण विभागाचा आढावा गट शिक्षण अधिकारी मुजावर मॅडम यांनी सादर केला. यावेळी जिल्हा परिषद शाळांच्या रखडलेल्या परीक्षा, मुलांना देण्यात येणारे शिक्षण आदींबाबत विचारणा करताना उपसभापती रमेश देशमुख यांनी शिक्षण विभागाची कानउघाडणी केली. 

सविस्तर वृत्तासाठी वाचा उद्याचा दैनिक प्रीतिसंगम